राष्ट्रीय

‘आप’ इंडिया आघाडीतून बाहेर; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांचे ऐक्य कमकुवत

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जोरदार धक्का देत शुक्रवारी आम आदमी पक्षाने (आप) ‘इंडिया आघाडी’सोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. ‘आप’ने उचललेल्या या पावलामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांचे ऐक्य खिळखिळे होणार असल्याची चर्चा आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जोरदार धक्का देत शुक्रवारी आम आदमी पक्षाने (आप) ‘इंडिया आघाडी’सोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. ‘आप’ने उचललेल्या या पावलामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांचे ऐक्य खिळखिळे होणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ‘अबकी बार ४०० पार’ची गर्जना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीएने निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘इंडिया आघाडी’ने भाजपला २४० जागांवर तर एनडीएला ३०० जागांच्या आत रोखले होते.

ऐक्य खिळखिळे

मात्र आता विरोधी पक्षांच्या या इंडिया आघाडीतील ऐक्य खिळखिळे होताना दिसत आहे. त्यातच शुक्रवारी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असून, आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीसोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीसह अनेक निवडणुका आपने स्वबळावर लढल्या होत्या.

काही पक्षांबरोबर समन्वय

दरम्यान, आपने इंडिया आघाडीपासून फारकत घेण्याची औपचारिक घोषणा केली आहे. याबाबत आपचे नेते संजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमचा पक्ष इंडिया आघाडीने बोलावलेल्या बैठकीमध्ये सहभागी होणार नाही. आमचा पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी आप हा इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही आम आदमी पक्ष संसदीय प्रश्नांवर तृणमूल काँग्रेस, डीएमके यांसारख्या विरोधी पक्षांसोबत समन्वय राखून त्यांना पाठिंबा देईल.

समय रैनासह ५ कॉमेडियन्सना 'सर्वोच्च' दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणातील सर्व FIR रद्द

स्वातंत्र्यदिनाआधी दिल्ली उच्च न्यायालय, विमानतळासह अन्य ठिकाणी बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

'हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?' NALSAR प्रकरणात सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा BCI ला सवाल

ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

अल्पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न; ATS कडून आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश