राष्ट्रीय

एबीएफआरएलचा तिमाही नफा घसरून १०७.६० कोटी

Swapnil S

नवी दिल्ली : आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लि.ला डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत रु. १०७.६० कोटींचा एकत्रित निव्वळ तोटा झाला. आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (ABFRL) च्या नियामक फाइलिंगनुसार, एक वर्षापूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत कंपनीने ११.२१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

वरील तिमाहीत कंपनीचा महसूल ४,१६६.७१ कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वीच्या कालावधीत, वरील तिमाहीत कंपनीचे कामकाजातून उत्पन्न ३,५८८.८० कोटी रुपये होते. आदित्य बिर्ला ग्रुप फर्मच्या मते, टीसएनएस क्लोदिंग आणि स्टाईलवर्स लाइफस्टाईलच्या अधिग्रहणाच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीचे एकत्रित आर्थिक निकाल मागील तिमाहीशी तुलना करता येत नाहीत. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च ४,३०२.९३ कोटी रुपये होता.

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

सीएसएमटीतील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती