अभिजीत दिपकेंवर शाईफेक; महिला पोलिसांच्या ताब्यात, Video (X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
राष्ट्रीय

अभिजीत दिपकेंवर शाईफेक; महिला पोलिसांच्या ताब्यात, Video

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके उपस्थितांना संबोधित करत असताना एका महिलेने त्यांच्यावर...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात हलवल्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी (दि. १८) जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

जंतर-मंतरवर गोंधळ

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके उपस्थितांना संबोधित करत असताना एका महिलेने त्यांच्यावर शाईसदृश द्रव फेकला. या घटनेमुळे काही काळ कार्यक्रमात गोंधळ उडाला. दिपके यांच्या समर्थकांनी तत्काळ मंचाकडे धाव घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये संबंधित महिला दिपके यांच्यावर शाई फेकताना दिसत आहे. घटनेनंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची ओळख आणि शाई फेकण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दिपकेंची प्रतिक्रिया

शाईफेकीच्या घटनेनंतर अभिजीत दिपके यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत, "निळा हा माझा रंग आहे... जय भीम!" (Blue is my colour… Jai Bhim!) अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावरही चर्चा सुरू असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

वांगचुक रुग्णालयात; दिपकेंचे बेमुदत उपोषण

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना बेमुदत उपोषणाच्या २१ व्या दिवशी प्रकृती खालावल्यानंतर वैद्यकीय सल्ला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शनिवारी पहाटे सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेनंतर अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. "मी आतापासून बेमुदत उपोषण सुरू करत आहे," असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.

पोलिसांवर आरोप

दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर आपल्याला मारहाण करून ताब्यात घेतल्याचा तसेच आंदोलनस्थळी प्रवेश नाकारल्याचा आरोप केला. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी देशव्यापी शांततापूर्ण बंदचे आवाहनही केले.

'चलो संसद' मोर्चा कायम

वांगचुक यांच्या समर्थकांनी २० जुलै रोजी संसदेकडे 'चलो संसद' मोर्चा काढण्याचा निर्णय कायम ठेवला असून, आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, जंतर-मंतर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती