ही पहिली विकेट आहे - अभिजीत दिपके (Photo-X/@Cockroachisback)
राष्ट्रीय

ही पहिली विकेट आहे - अभिजीत दिपके

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांना मोबाईलवर कळली.

Swapnil S

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांना मोबाईलवर कळली. त्यानंतर त्यांनी वी हॅव डन इट असे म्हणून समोरच्या तरुणाईला ती खबर दिल्यानंतर एकच जल्लोष झाला. त्यानंतर दीपके यांचे जोरदार भाषण झाले. ते म्हणाले की, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असे एनडीएचे नेते सांगत होते. पण आपण करून दाखवले आहे.

'झुकते दुनिया, झुकवणारा पाहिजे असे सांगून त्यांनी ही (केवळ) पहिली विकेट आहे असे सूचक उद्‌गार यावेळी काढले. सुबह हो गयी है मामू असे म्हणून त्यांनी पंतप्रधानांना थेट इशाराही दिला.

सरन्यायाधीशांचे आभार

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत दीपके म्हणाले, जर तुम्ही आम्हाला 'कॉकरोच' म्हटले नसते, तर मी भारतात परतलो नसतो. जर तुम्ही आम्हाला 'कॉकरोच' म्हटले नसते, तर देशातील तरुण रस्त्यावर उतरले नसते आणि जर तुम्ही आम्हाला 'कॉकरोच' म्हटले नसते, तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नसता, असे सांगत त्यांनी सूर्य कान्त यांचे आभार मानले त्यानंतर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दीपके यांना विषमज्वर

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना विषमज्वर (टायफॉइड) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात दीपके यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आंदोलन देशभरात जिवंत ठेवल्याबद्दल त्यांनी सीजेपी समर्थकांचे आभार मानले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती