Kolkata : अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर छापे 
राष्ट्रीय

Kolkata : अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर छापे

प. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी कोलकाता पोलिसांनी शनिवारी पहाटे ३ वाजता छापे मारले.

Swapnil S

कोलकाता : प. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी कोलकाता पोलिसांनी शनिवारी पहाटे ३ वाजता छापे मारले. पोलिसांचे पथक केंद्रीय पोलिसांच्या जवानांसोबत आले होते. पोलीस अधिकारी आत शिरले, तर जवान गेटबाहेर पहारा देत उभे होते. ही शोधमोहीम सुमारे चार तास चालली. छाप्याची माहिती मिळताच ममता बॅनर्जी तत्काळ अभिषेकच्या घरी आल्या, थोडा वेळ थांबल्या आणि नंतर निघून गेल्या.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, अभिषेकचा वैयक्तिक सहाय्यक सुमित रॉय याचा शोध घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आला होता. सुमितविरुद्ध साल्बोनी पोलीस ठाण्यात 'आर्थिक फसवणुक' प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रॉयचा मोबाईल फोन शेवटचा बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी असल्याचे निष्पन्न झाल्याने हा छापा टाकण्यात आला.

अभिषेक यांनी आरोप केला आहे की, पोलीस अधिकाऱ्यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून प्रत्येक खोलीची झडती घेतली. बनावट सही प्रकरणात त्याच्याविरुद्ध सीआयडी तपास सुरू असतानाच हा छापा टाकण्यात आला.

निव्वळ राजकीय सूड, दहशत

तृणमूल खासदार सागरिका घोष यांनी 'एक्स'वर लिहिले की, पोलिसांना शोधादरम्यान काहीही सापडले नाही. हा निव्वळ राजकीय सूड, दहशत आणि मानसिक छळ होता. 'ऑपरेशन लोटस' हे भाजपच्या आदेशांपुढे न झुकणाऱ्या सर्व नेत्यांना लक्ष्य करत आहे. हे विरोधी पक्षांविरुद्ध सूडाचे कृत्य आहे. हे घृणास्पद आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च