संग्रहित छायाचित्र / FPJ
राष्ट्रीय

सुमारे ७० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, जम्मू-काश्मीरचे डीजीपी रश्मी रंजन स्वेन यांची माहिती

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील हस्तक्षेप थांबवला नसून नियंत्रणरेषेपलीकडील लाँच पॅडवर सुमारे ६० ते ७० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी रंजन स्वेन यांनी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला रविवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले.

Swapnil S

श्रीनगर : पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील हस्तक्षेप थांबवला नसून नियंत्रणरेषेपलीकडील लाँच पॅडवर सुमारे ६० ते ७० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी रंजन स्वेन यांनी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला रविवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले.

संरक्षण दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारत आहे. पाकिस्तान आणि त्यांच्या पाठीराख्यांची क्षमता खच्ची केली जात आहे. पण अद्याप पाकिस्तानने भारतात दहशतवादी आणि शस्त्रे पाठवणे थांबवलेले नाही. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे ६० ते ७० दहशतवादी सध्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते पाच ते सहा जणांच्या लहान गटांमध्ये भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करू शकतात, असे रश्मी रंजन स्वेन यांनी सांगितले. काश्मीरमध्ये परदेशी दहशतवादीही सक्रिय असल्याचे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमधून भारतात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे, अमली पदार्थ आदी गोष्टी पाठवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे; मात्र, भारतीय सेनादले पाकिस्तानचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत. आम्ही शत्रूचे बेत हाणून पाडू. अर्थात त्यासाठी सर्व संरक्षणदलांत आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे, असेही रश्मी रंजन स्वेन म्हणाले.

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

लालबागचा राजाच्या विसर्जनात ‘विघ्न’; तब्बल ३३ तासांनंतर रविवारी रात्री उशिरा विसर्जन

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान ११ जणांचा मृत्यू

भटक्या विमुक्तांचा आभासी मुक्ती दिन!

भूपेनदा (डॉ. भूपेन हजारिका) यांना आदरांजली