विमान वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीची परवानगी द्या! अदानी समूहाची केंद्र सरकारला विनंती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

विमान वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीची परवानगी द्या! अदानी समूहाची केंद्र सरकारला विनंती

देशभरात अनेक विमानतळांचे संचालन करणाऱ्या ‘अदानी समूहा’ने आता विमान वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

Swapnil S

मुंबई : देशभरात अनेक विमानतळांचे संचालन करणाऱ्या ‘अदानी समूहा’ने आता विमान वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

'इंडिया डेट कॅपिटल मार्केट समिट'च्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी देशातील हवाई वाहतुकीच्या क्षमतेवर भाष्य केले. देशातील ६० कोटींहून अधिक नागरिक विमान प्रवास करू शकतात. त्यासाठी दररोजच्या विमान उड्डाणांची संख्या जवळपास दहा पटींनी वाढवून ३० हजारांपर्यंत नेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘विमान कंपन्यांच्या विकासाला चालना देता यावी, यासाठी आम्हाला किमान या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही सरकारकडे केली आहे. एखादा निधी, इतर विमान कंपनी किंवा या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन उद्योजकाला पाठबळ देण्यासाठी ही गुंतवणूक उपयुक्त ठरेल,’ असे सिंग यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी जुलैमध्ये समूहाने विमान वाहतूक व्यवसायात उतरण्याच्या कोणत्याही प्रस्तावाचा विचार करत नसल्याचे म्हटले होते. तसेच, ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनीही ३ नोव्हेंबर रोजी थेट विमान वाहतूक व्यवसायात उतरण्याची शक्यता फेटाळून लावली होती. आपल्याच ग्राहकांशी स्पर्धा करणे ही कधीही चांगली रणनीती नसते, असे बन्सल यांनी तेव्हा सांगितले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सिंधुदुर्ग-मुंबई विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांना बसने मोपा विमानतळावर हलविले; विमानाचे दोनदा उड्डाण रद्द

दुष्काळाविरुद्ध लोकचळवळ उभारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन - 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचा शुभारंभ

Kosi Express Viral Video : ट्रेनला आग लागल्याची अफवा अन् प्रवाशांची घाबरगुंडी! महिला-मुलांसह ट्रेनमधून मारल्या उड्या

BMC शाळांतील विद्यार्थी जाणार सिंगापूरला; वैज्ञानिक क्षेत्रातील अनुभव घेत भरारी घेणार; ३५ विद्यार्थी अन् पाच शिक्षकांचा सहलीत समावेश

मुंबई विमानतळावर ३९.८ कोटींचे ड्रग्ज, सोने जप्त; ९ जणांना अटक