एक्स @gautam_adani
राष्ट्रीय

अदानी समूह उभारणार ‘हेल्थ सिटी’; पायाभूत सुविधांनंतर आता आरोग्य क्षेत्रात प्रवेश

विमानतळ, बंदर, संरक्षण, विशेष आर्थिक क्षेत्र, एफएमसीजी, ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेला अदानी समूह आता आरोग्य क्षेत्रात प्रवेश करणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : विमानतळ, बंदर, संरक्षण, विशेष आर्थिक क्षेत्र, एफएमसीजी, ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेला अदानी समूह आता आरोग्य क्षेत्रात प्रवेश करणार आहे. भारतातील उद्योगपती गौतम अदानी यांनी अमेरिकेतील ‘मायो क्लीनिक‘सोबत भागीदारी केली असून ‘अदानी हेल्थ सिटी’ स्थापन केली जाणार आहे.

या योजनेत मुंबई आणि अहमदाबादमध्ये दोन वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत. एक हजार बेडची क्षमता असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अदानी समूहाकडून ६ हजार कोटी रुपयांची देणगी दिली जाणार आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये ‘अदानी हेल्थ सिटी’ बनवण्याची योजना समूहाने बनवली आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षी १५० पदवीधर, ८० हून अधिक निवासी डॉक्टर्स व ४० हून अधिक फेलोना प्रवेश मिळेल. समाजातील सर्व वर्गांना किफायतशीर दरात जागतिक दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळावी, हा यामागे हेतू आहे.

अदानी समूहाने दोन रुग्णालयांच्या संघटनात्मक आराखडा व क्लीनिकल प्रॅक्टीससाठी सल्लागार म्हणून अमेरिकेतील ‘मायो क्लीनिक’ची नेमणूक केली आहे.

वैद्यकीय नाविन्यतेवर भर देणार

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी माझ्या ६० व्या वाढदिवसानिमित्त माझ्या कुटुंबाने आरोग्य, शिक्षण व कौशल्य विकास आदींसाठी ६० हजार कोटी रुपये देण्याचे वचन दिले होते. ‘अदानी हेल्थ सिटी’ हा त्यातील पहिला भाग आहे. भारतातील प्रत्येक उत्पन्न गटाच्या लोकांना स्वस्त, जागतिक दर्जाची आरोग्य सेवा याद्वारे पुरवण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठा वैद्यकीय समूह मायो क्लीनिकसोबत आमची भागीदारी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून आरोग्य क्षेत्रातील नाविन्यतेपूर्णतेवर भर देण्यात येईल. तसेच यात गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार केले जातील.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस