राष्ट्रीय

एडीबीकडून भारताचा जीडीपीवृद्धी अंदाजात कपात

२०२२-२३च्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १३.५ टक्के दराने वाढ केली आहे

वृत्तसंस्था

आशियाई विकास बँके (एडीबी)ने आर्थिक वर्ष २०२२-२३साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज ७.२ टक्क्यांवरून सात टक्क्यांवर आणला आहे. आशियाई विकास बँकेने यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त महागाईचा होत असल्याचा ठपका ठेवला आहे. एडीबीने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या त्याच्या प्रमुख एडीओ अहवालाच्या पुरवणीत म्हटले आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष २०२२-२३च्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १३.५ टक्के दराने वाढ केली आहे.

एडीबीने अहवालात म्हटले आहे की जीडीपी वाढ एडीओ २०२२च्या अंदाजावरून आर्थिक वर्ष २०२२साठी ७ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२३साठी ७.२ टक्के कमी केला आहे. किमतीतील दबाव आणि मंदावलेली जागतिक मागणी यामुळे देशांतर्गत वापरावर विपरीत परिणाम होतो. यासोबतच तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे निव्वळ निर्यातीवरही दबाव येण्याची शक्यता आहे.

एडीओच्या अहवालानुसार, या कालावधीत, चीनची अर्थव्यवस्था २०२२मध्ये ३.३ टक्के दराने वाढेल, जी आधीच्या ५ टक्के अंदाजाऐवजी ३.३ टक्के वाढेल. अहवालात म्हटले आहे की शून्य कोविडच्या धोरणामुळे लॉकडाऊन, मालमत्ता क्षेत्रातील समस्या आणि कमकुवत बाह्य मागणीचा चीनमधील आर्थिक घडामोडींवर परिणाम होत आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस; पुढील तीन तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा रेड अलर्ट

डाॅक्टरांचा गुरुवारी संप; सरकारच्या नवीन अधिसूचनेविरुद्ध IMAचा इशारा

भारताची सागरी सुरक्षा आणखी बळकट; नौदलात पाणबुडीविरोधी युद्धनौका दाखल

नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी भूमिपुत्रांचा हुंकार; दि. बा. पाटलांच्या नामकरणासाठी भव्य कार रॅली

Mumbai : थांब्यावरून रिकाम्या बस नेण्याचा प्रकार सुरूच; बेजबाबदार बसचालकांवर कारवाईची प्रवाशांकडून मागणी