राष्ट्रीय

आदित्य एल-१ यानाच्या कक्षेचा तिसऱ्यांदा विस्तार

आदित्य एल-१ हे यान इस्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी अंतराळात पाठवले आहे

नवशक्ती Web Desk

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी आदित्य एल-१ यानाच्या पृथ्वीभोवतालच्या कक्षेचा तिसऱ्यांदा विस्तार केला. असा प्रकारची पाच ऑर्बिंट-रेझिंग मनुव्हर्स करण्यात येणार आहेत. त्यापैकी तीन क्रिया आता पार पडल्या आहेत.

आदित्य एल-१ हे यान इस्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी अंतराळात पाठवले आहे. श्रीहरीकोटा येथील तळावरून त्याचे २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपण झाले होते. त्यानंतर त्याला पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थापित करण्यात आले. सध्या त्याला पृथ्वीपासून अधिकाधिक दूरवरच्या कक्षेत पाठवले जात आहे. रविवारी अशा प्रकारचे तिसरे ऑर्बिट-रेझिंग मनुव्हर पार पडले. आता यान पृथ्वीभोवताली कमीतकमी २९६ किमी आणि अधिकतम ७१,७६७ किमी इतक्या अंकरावरील लंबवर्तुळाकार कक्षेत पोहोचले आहे. बंगळुरू, अंदमान-निकोबार बेटांमदील पोर्ट ब्लेअर आणि मॉरिशस येथून यानाचा मागोवा घेतला जात आहे.

असा प्रकराच्या पाचव्या क्रियेनंतर यानाचा प्रत्यक्ष सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू होईल. चार महिन्यांत १५ लाख किमीचा प्रवास करून यान अंतराळातील लॅग्रान्ज बिंदू क्रमांक १ वर पोहोचेल. तेथून ते सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करेल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

ठाकरेंचे वलय संपले का?