राष्ट्रीय

अर्जेंटिनामधील पाच लिथियम ब्लॉक्सच्या शोधासाठी करार

Swapnil S

नवी दिल्ली : अर्जेंटिनामधील पाच लिथियम ब्लॉक्सच्या शोधाशी संबंधित भारत सरकारचा करार कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरेल. याशिवाय लिथियमच्या आयातीसाठी भारताचे चीनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. भारत सरकारने लिथियमच्या उत्खनन आणि खाणकामासाठी अर्जेंटिनासोबत करार केला आहे. १५,७०३ हेक्टर क्षेत्रावरील पाच लिथियम ब्राइन ब्लॉक्सचा समावेश असलेला हा भारतातील पहिला लिथियम शोध आणि खाण प्रकल्प आहे.

या धोरणात्मक हालचालीमुळे भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील द्विपक्षीय संबंध केवळ मजबूत होणार नाहीत, तर खाण क्षेत्राच्या शाश्वत विकासालाही हातभार लागेल, ज्यामुळे विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिजांसाठी वातावरण उपलब्ध होईल, असे केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे. पर्यावरणास अनुकूल भविष्यात सकारात्मक बदलासाठी लिथियम आवश्यक आहे. ऊर्जा रूपांतरणासाठी लिथियम हे सर्वात महत्त्वाचे खनिज म्हणून ओळखले जाते.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!