राष्ट्रीय

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसींच्या घरावर दगडफेक; म्हणाले, '२०१४ पासून ही...'

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्लीतील घरावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती ट्विट करत दिली

प्रतिनिधी

एआयएमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्लीतील घरावर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटकरत माहिती दिली असून रविवारी १९ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले की, "दिल्लीतील माझ्या घरावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. २०१४ पासून ही चौथी घटना आहे. रविवारी संध्याकाळी मी जयपूरहून परतल्यानंतर मला दिल्लीतील सहकाऱ्यांनी ही माहिती दिली. या दगडफेकीत खिडकीची काच फुटली असून मला चिंता वाटते कारण हा प्रकार कथित उच्च सुरक्षा असलेल्या विभागामध्ये घडला आहे. याबद्दल मी पोलिसांकडे तक्रार केली आहे." अशी माहिती त्यांनी दिली. यावरून, दिल्ली पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेऊ, असे आश्वासन दिले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत