९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; ग्रंथनगरीत पुस्तक खरेदीकडे रसिकांचा ओढा!

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी! अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाल्यानंतर मराठी साहित्याकडे आता तरुणवर्गाचाही ओढा वाढू लागला आहे. त्यातच आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ग्रंथनगरीमध्ये पुस्तक प्रकाशन संस्थांच्या स्टॉलला विविध राजकीय नेते आणि मान्यवरांनी लावलेली हजेरी हा औत्सुक्याचा विषय ठरला.

राकेश मोरे

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी! अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाल्यानंतर मराठी साहित्याकडे आता तरुणवर्गाचाही ओढा वाढू लागला आहे. त्यातच आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ग्रंथनगरीमध्ये पुस्तक प्रकाशन संस्थांच्या स्टॉलला विविध राजकीय नेते आणि मान्यवरांनी लावलेली हजेरी हा औत्सुक्याचा विषय ठरला. दिल्लीत स्थायिक झालेल्या मराठीजनांनी मराठी साहित्याच्या ओढीने पुस्तक दालनांना भेट देत पुस्तक खरेदीचा आनंद घेतला. तरुणाईची संख्याही लक्ष्यवेधी होती.

प्रथमच अभिजात मराठीचे बिरुद घेऊन सुरू असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त राजधानी दिल्लीत १००हून अधिक प्रकाशन संस्थांनी सहभाग दर्शविला आहे. त्यानिमित्ताने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विश्वजित कदम यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई त्यांच्या पत्नी सुप्रसिद्ध लेखिका सागरिका घोष, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, मसापचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतीश देसाई, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या लिखित पुस्तकांचे स्वतंत्र दालनही येथे पाहायला मिळाले.

साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवसापासून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने उत्तम विक्री झाल्याचे प्रकाशकांनी आवर्जून सांगितले. साहित्य संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातील विविध साहित्य रसिक तसेच दिल्ली येथे स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांनी संमेलनातील विविध उपक्रमांसह ग्रंथनगरीतील प्रकाशकांच्या स्टॉल्सना उत्साहाने भेट दिली.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री