राष्ट्रीय

‘अल-कायदा’शी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

गुजरात एटीएसने ‘अल-कायदा’शी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोन जणांना गुजरातमधून तर दिल्ली आणि नोइडातून प्रत्येकी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

Swapnil S

अहमदाबाद : गुजरात एटीएसने ‘अल-कायदा’शी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोन जणांना गुजरातमधून तर दिल्ली आणि नोइडातून प्रत्येकी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

गुजरात एटीएसने पकडलेल्या चार दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे चौघेही ‘अल-कायदा’च्या मॉड्यूलशी संबंधित होते. चौघांचे वय २० ते २५ वर्षांच्यादरम्यान असून, भारतात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते.

झीशान, फरदीन, सैफुल्ला आणि फारिक अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. एटीएसच्या मते, चौघेही सोशल मीडियाद्वारे ‘अल-कायदा’चा प्रचार-प्रसार आणि या गटात लोकांना जोडण्याचे काम करायचे. ही अटक सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. गुजरात एटीएस आणि केंद्रीय संस्था आता त्यांच्या नेटवर्क, निधी, प्रशिक्षण आणि परदेशी संपर्कांचे दुवे जोडण्यात गुंतल्या आहेत. येत्या काळात या प्रकरणात आणखी खुलासे आणि अटका होऊ शकतात.

मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘तो’ विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याबाबत नेहरूंनंतर दुसऱ्या स्थानी

न्या. वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव प्रथम लोकसभेत मांडणार

अश्लील कंटेट प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्राची बंदी

शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र