PM
राष्ट्रीय

वसाहतवादी वारशाचे सर्व अवशेष पुसून टाकावे ;आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे आवाहन

Swapnil S

गुवाहाटी : वसाहतवादी वारशाचे सर्व अवशेष पुसून टाकावे तसेच आत्मनिर्भर राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र काम करावे, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी लोकांना केले.

स्वातंत्र्यसैनिक कनकलता बरुआ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सोनितपूर जिल्ह्यातील गोहपूर येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. त्यांनी आसामच्या जनतेला शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत (आयटी) सर्व क्षेत्रांचा समावेश करणारी चळवळ उभारण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन केले. जेणेकरून राज्य आर्थिक स्वयंपूर्णत: प्राप्त करू शकेल. 

ते म्हणाले की, भारत स्वातंत्र्याच्या १०० वर्षांच्या दिशेने वाटचाल करत आहे, तेव्हा आपल्या वसाहतवादी वारशाचे सर्व अवशेष नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी काम केले पाहिजे.

१९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान गोहपूर पोलीस स्टेशनच्या आवारात तिरंगा फडकविण्यासाठी एका गटाचे नेतृत्व करत असताना सतरा वर्षीय कनकलता याची पोलिसांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सरमा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतील सध्याची राजवट वसाहतवादी वारसा दूर करण्याचे काम करत आहे.

वसाहतवादी काळातील फौजदारी न्याय कायद्यांच्या जागी नवीन कायदे करणे, संसदेच्या नवीन इमारतीत स्थलांतरित करणे आणि रस्त्यांचे नामांतर करणे ही कामे करीत मोदी आणि शहा यांनी वसाहतवादी वारशातून देश कसा बाहेर पडत आहे हे दाखवून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत