राष्ट्रीय

केंद्रीय मंत्र्याच्या कारच्या दरवाजाला धडकून वृद्धाचा मृत्यू

मंत्री शोभा करंदलाजे या प्रचारासाठी जात होत्या. करंदलाजे यांच्या कारचा दरवाजा उघडताच, प्रकाश हे दरवाजाला धडकून खाली पडले आणि मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. मात्र, दरवाजा करंदलाजे यांनी उघडला, की आणखी कुणी? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात मंत्री करंदलाजे यांनी अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

Swapnil S

बंगळुरू : बंगळुरू येथे सोमवारी केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांच्या कारच्या उघडलेल्या दरवाजाला धडकल्यानंतर प्रकाश नावाच्या वृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

मंत्री शोभा करंदलाजे या प्रचारासाठी जात होत्या. करंदलाजे यांच्या कारचा दरवाजा उघडताच, प्रकाश हे दरवाजाला धडकून खाली पडले आणि मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. मात्र, दरवाजा करंदलाजे यांनी उघडला, की आणखी कुणी? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात मंत्री करंदलाजे यांनी अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

बंगळुरू वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री प्रचारात व्यस्त होत्या. त्या आपल्या कारमधून उतरून प्रचारासाठी एका गल्लीत गेल्या होत्या. दरम्यान, कारमधील चालकाने अचानक दरवाजा उघडला. यामुळे मागून येणारा दुचाकीस्वार खाली पडला. तेवढ्यात मागून येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक