राष्ट्रीय

लंडनमधील एका भारतीयाने लॉकडाऊनमध्ये बनवले घरीच विमान

अशोक मूळचे केरळचे असून ते माजी आमदार ए. व्ही. थमराक्षण यांचे पुत्र आहेत

वृत्तसंस्था

कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले असतानाच, लंडनमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाने सुट्टीचा आनंद घेण्याचा अनोखा मार्ग शोधला. व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर असलेल्या अशोक अलसेरिल थमराक्षण यांनी १८ महिन्यांत स्वतःचे चार आसनी विमान तयार करत संपूर्ण ब्रिटनचा प्रवासही केला.

अशोक मूळचे केरळचे असून ते माजी आमदार ए. व्ही. थमराक्षण यांचे पुत्र आहेत. पलक्कड अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक केल्यानंतर, ते मास्टर्स पदवीसाठी २००६मध्ये ब्रिटनला गेले. सध्या फोर्ड मोटर कंपनीत ते अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी घरी बनवलेल्या विमानाचे नाव ‘जी-दिया’ म्हणजेच त्यांची मोठी मुलगी दियाच्या नावावर ठेवले आहे. विमान बनवल्यानंतर त्यांनी पत्नी आणि दोन मुलींसह संपूर्ण ब्रिटनची सैर केली. २०१८पर्यंत मी पायलटचा परवाना मिळवल्यानंतर छोट्या प्रवासासाठी दोन आसनी विमान भाड्याने घ्यायचो. यानंतर मला माझी पत्नी आणि दोन मुलींसाठी चार आसनी विमानाची गरज होती. जोहान्सबर्गची कंपनी स्लिंग एअरक्राफ्टकडून विमानाचे किट मागवले. लंडनमध्ये घरीच वर्कशॉप तयार करून विमान तयार झाले. त्यावर नागरी उड्डाण प्राधिकरणाचे कर्मचारी लक्ष ठेवून होते.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश