अमरावती : बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात स्थित असलेल्या ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने रविवारी जाहीर केले.
सध्या बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात असलेले चक्रीवादळ ‘दितवाह’ हे आंध्रच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडू–पुदुद्देचरी किनारपट्टीलगत आणि त्यापासून सुमारे ३० ते ७० किमी अंतरावरून सरकत राहील आणि त्यामुळे आंध्र प्रदेशात पाऊस वाढेल.
आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवर येते दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता असून ३५–४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.
आंध्र प्रदेशात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रायलसीमा प्रदेशातही सोमवारी बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तसेच एक-दोन ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
तिघांचा मृत्यू
चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे तमिळनाडूमध्ये तीन जणांना मृत्यू झाला आहे. तूतीकोरिन आणि तंजावुर येथे रविवारी भिंत कोसळल्यामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला, तर मयिलादुथुराईमध्ये विजेच्या झळा लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला.