राष्ट्रीय

आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू ; आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या चित्त्यांची संख्या 'आठ'वर

तीन दिवसांपूर्वीच आफ्रिकेतून आणेल्या तेजस नावाच्या नर चित्त्याचा मृत्यू झाला होता

नवशक्ती Web Desk

मध्ये प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. सुरज असं या नर चित्त्याचं नाव आहे. या वर्षीच्या मार्च महिन्यात आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांपैकी मृत्यूमुखी पडलेल्या चित्त्यांची सख्या आठ झाली आहे. तीन दिवसांपूर्वीच आफ्रिकेतून आणेल्या तेजस नावाच्या नर चित्त्याचा मृत्यू झाला होता. वन अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास पालपूर पूर्व रेंजमधील मसावनी भागात सुरजला निरिक्षण पथकाला दिसून आला होता. सूरज यावेली जमिनीवर पडलेला होता तसंच त्याच्या अंगावर किडे संचार करत होते. अशा अवस्थेत असताना तो निरिक्षण पथकाला बघून पळू लागला. यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टर आणि वन अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पोहचले त्यावेळी चित्ता त्यांना मृत अवस्थेत आढळून आला. यावेळी त्याच्या पाठीवर आणि मानेवर जखमेच्या खूणा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

११ जुलै रोजी आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका नर चित्त्याचा मृत्यू झाला होता. निरिक्षण पथकाला तेजस हा जखमी अवस्थेत आढळून आला त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. त्याच्या पोस्टमॉर्टम अहवालात तो कमकुवत असल्याचं समोर आलं होतं. कुनो नॅशनल पार्कमध्ये सतत चित्ते मरण पावले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्तंय आठ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

चित्त्यांच्या होणाऱ्या मृत्यू बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मे महिन्यात याबाबत झालेल्या सुनावणीवर न्यायालयाने चित्त्यांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली होती. केवळ एकाच ठिकाणी चित्त्यांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नसल्याचं म्हणत इतर अभयाअरण्यात तेखील त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न व्हायला हवा असं न्यायालयाने म्हटलं होतं. यावेळी आपण सरकारवर प्रश्न उपस्थिती करत नसून आपल्याला फक्त चित्त्यांबाबत चिंता वाटत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या