राष्ट्रीय

दिल्लीत पुन्हा भीषण अपघात, साडेतीनशे मीटरपर्यंत घेऊन फरपटत नेले

वृत्तसंस्था

दिल्लीतील धक्कादायक अपघातांच्या घटनेचे सत्र सुरूच आहे. कंझावाला येथील भीषण घटनेनंतर आता केशवपुरम परिसरातही अशीच एक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका वेगवान कार चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली, परिणामी अपघात इतका भीषण झाला की दुचाकीस्वार आणि त्याचा सहकारी दोघेही कारला धडक देऊन हवेत फेकले गेले. त्यातील एक गाडीच्या छताला धडकून रस्त्यावर पडला, तर दुसरा बोनेटवर अडकून त्याची दुचाकी कारमध्ये अडकली. एवढं करूनही भरधाव वेगात जाणारी कार थांबली नाही, ती दोघांना साडेतीनशे मीटरपर्यंत फरपटत घेऊन गेली. त्यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. या भीषण घटनेची माहिती मिळताच केशवपुरम पोलीस आणि पीसीआर व्हॅन पोलिसांनी परिसरात गस्तीवर असलेल्या कार चालकासह पाच जणांना अटक केली.

अपघातातील गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. कैलास भटनागर असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून सुमीत खारी असे गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर, या घटनेतील सर्व आरोपी हे विद्यार्थी असून लग्न समारंभातून घरी निघाले होते आणि मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?

काय सांगता! Bajajनं आणली चक्क CNG BIKE, 'या' दिवशी होणार लॉन्च

"दिलेला शब्द पाळला नाही"; उमेदवारी नाकारल्याने खासदार गावित नाराज