राष्ट्रीय

Pathaan : "रात्री २ वाजता शाहरुखने मला फोन केला आणि म्हणाला..." ; 'पठाण'बद्दल काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?

आसामच्या गुवाहाटीमध्ये पठाणचे (Pathaan) पोस्टर्स जाळण्यात आले होते, त्यानंतर अभिनेता शाहरुख खानने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याशी संपर्क साधला

प्रतिनिधी

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा बऱ्याच वर्षांनी 'पठाण' (Pathaan) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एकीकडे त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली असताना प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट अनेक वादांमध्ये सापडला आहे. 'बेशरम रंग' या गाण्यामध्ये दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीवरणु मोठा वादंग झाला. यामुळे आसामच्या गुवाहाटीमध्ये बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात शाहरुख खानच्या चित्रपटाचे पोस्टर्स जाळले होते. यासंदर्भात उत्तर देताना आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी, "कोण आहे शाहरुख खान? मी त्याला ओळखत नाही. आसामच्या जनतेने हिंदी भाषेतील नव्हे तर आसामी भाषेतील चित्रपटांची काळजी करावी," असे वक्तव्य केले होते.

यानंतर आज मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सांगितले की, "बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानने मध्यरात्री २ वाजता फोन केला होता. रात्री २ वाजता आमच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. गुवाहाटीमध्ये त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून झालेल्या घटनेबद्दल त्याने दु:ख व्यक्त केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारचे आहे, असे सांगत मी त्यांना आश्वासित केले. आम्ही याबाबत चौकशी करून आगामी काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेऊ." असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश