आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

लिलावातील घसरते भाव, हवामान बदलाचे संकट आणि ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी या पार्श्वभूमीवर, आसाममधील एका चहाच्या मळ्याने चहाची ओळख केवळ 'रोजचे पेय' न ठेवता, ती एक सांस्कृतिक आणि नावीन्यपूर्ण अनुभव देणारे उत्पादन म्हणून निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

­कोलकाता : लिलावातील घसरते भाव, हवामान बदलाचे संकट आणि ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी या पार्श्वभूमीवर, आसाममधील एका चहाच्या मळ्याने चहाची ओळख केवळ 'रोजचे पेय' न ठेवता, ती एक सांस्कृतिक आणि नावीन्यपूर्ण अनुभव देणारे उत्पादन म्हणून निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फॅक्टरी भेटी, चहाचे आस्वाद सत्र (टी-टेस्टिंग) आणि ग्राहकांशी थेट संवाद साधणारे उपक्रम राबवले जात आहेत.

'आमचॉन्ग टी इस्टेट'ने 'आमचॉन्ग लीफ' सुरू केले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे भारतातील पहिले समर्पित चहा अनुभव केंद्र आहे, जेथे येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शकासह मळ्याची सफर, फॅक्टरी फेरफटका, टी-टेस्टिंग सत्रे, चहा निर्मिती प्रक्रियेतील कामगारांशी संवाद आणि ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण अनुभवता येईल.

भारतातील चहा उद्योग वाढता उत्पादन खर्च, अनिश्चित हवामान आणि २०२५ मधील विक्रमी निर्यातीनंतरही लिलावातील स्थिर राहिलेले भाव यांमुळे मोठ्या दबावाखाली असताना हा उपक्रम समोर आला आहे.

गुवाहाटीच्या वेशीवर असलेले हे केंद्र पर्यटकांना चहाच्या पानापासून ते कपातील चहापर्यंतच्या प्रवासाची ओळख करून देते. उद्योग जगतातील निरीक्षकांच्या मते, जागतिक स्तरावर 'टी टुरिझम' (चहा पर्यटन) आणि अनुभवात्मक उपभोगाला मोठी पसंती मिळत आहे; विशेषतः प्रीमियम पेय विभागामध्ये, जिथे चहाचे मूळ स्थान, आरोग्यदायी फायदे आणि जीवनशैली ग्राहकांच्या निवडीवर प्रभाव पाडत आहेत. अनुभवात्मक चहा पर्यटनामुळे चहाबद्दल मागणी होऊ शकते.

  • भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा चहा उत्पादक आणि तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश असून, जागतिक चहा उत्पादनात भारताचा वाटा १९ टक्के आहे. तथापि, संघटित चहा उत्पादकांना घसरणारा नफा, वाढती मजुरी, उत्पादन खर्च आणि हवामानातील चढ-उतार यांमुळे सातत्याने आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

  • इंडियन टी असोसिएशनने नुकतेच म्हटले होते की, लिलावातील किमती वाढत्या उत्पादन खर्चाच्या गतीने वाढू शकलेल्या नाहीत, तर अत्यंत खराब हवामानामुळे मुख्य चहा उत्पादक क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

  • २०१६ पासून पारंपारिक सीटीसी चहाऐवजी 'ऑर्थोडॉक्स होल-लीफ' जातींचे उत्पादन सुरू केले आहे. ते प्रीमियम आणि स्पेशालिटी चहाकडे वळणाऱ्या संपूर्ण उद्योगाचे प्रतिनिधित्व करते.

  • असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत बांगूर यांनी अशा उपक्रमांचे स्वागत केले आणि म्हटले, चहाच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही कल्पनेचे स्वागत आहे आणि हा अनुभव फायदेशीर व समृद्ध करणारा असावा.

सोने-चांदी बाजारात मोठी घडामोड? अमेरिकी रोजगार आकडेवारी, इराणमधील तणावाचा परिणाम जाणवणार

Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

CJP Protest : ५ सप्टेंबरच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश

Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत