काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला

केरळ विधानसभा निवडणूक २०२६ च्या प्रचार मोहिमेदरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

Swapnil S

तिरुअनंतपूरम : केरळ विधानसभा निवडणूक २०२६ च्या प्रचार मोहिमेदरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यातून शशी थरूर थोडक्यात आणि सुखरूप बचावले असले, तरी त्यांच्या सुरक्षारक्षकाला (गनमॅनला) मारहाण करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून, वंडुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे आणि दोन वाहने जप्त केली आहेत.

प्रचाराला जाताना ताफा अडवण्यात आला

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, केरळमधील मलप्पुरम येथे एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. शशी थरूर हे वांडुर येथील एका निवडणूक प्रचार कार्यक्रमासाठी जात असताना, थिरुवल्ली चेलितोडू पुलाजवळ त्यांचा ताफा अडवण्यात आला, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, दुचाकीवरून आलेल्या काही व्यक्तींनी थरूर यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यांच्या सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली. थरूर यांचे अंगरक्षक (गनमॅन) त्यांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले. या दरम्यान झालेल्या झटापटीत गनमॅन जखमी झाला.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार