राष्ट्रीय

ममता बॅनर्जींवर हल्ला करण्याचा प्रयत्न ? घरात घुसणाऱ्या शस्त्रधारी तरुणाला अटक

या व्यक्तीकडे एक संशयास्पद बॅग देखील सापडली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे

नवशक्ती Web Desk

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात एका शस्त्रधारी तरुणाने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुकरी आणि सुरा घेऊन एका व्यक्तीने ममता बॅनर्जीयांच्या घरात प्रवेश केला आहे. ही व्यक्ती ज्या गाडीतून आली त्या गाडीवर पोलीस लिहलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीसांचा त्यांच्यावर संशय बळावल्याने त्यांनी थांबवून त्याची चौकश केली. यावेळी त्याची झडती घेत असताना त्याच्याकडे हत्यारे सापडली. यानंतर त्याल व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. यावेळी या व्यक्तीकडे एक संशयास्पद बॅग देखील सापडली आहे.

या व्यक्तीला अटक करुन कालीघाट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. पोलीसांकडून या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. या व्यक्तीकडे असलेल्या गाडीच्या मालकाचा शोध लागला असून नूर हमीम असं त्याच नाव आहे. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या घराभोवती आधीच कडक सुरक्षा व्यवस्था असते. असं अतानाता देखील हा शस्त्रधारी व्यक्ती घरात घुसल्याने त्यांच्या सुरक्षा यंत्रनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव