राष्ट्रीय

न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न; निवृत्त न्यायाधीशांचे सरन्यायाधीशांना पत्र

Swapnil S

नवी दिल्ली : काही लोकांकडून देशातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून केला आहे.

निवृत्त न्यायाधीशांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, न्यायव्यवस्था कमकुवत करण्यासाठी काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवत आहेत. आम्ही याबद्दल आमची चिंता व्यक्त करत आहोत. तसेच ही चिंतेची बाब असून या प्रकरणात लक्ष घालण्यात यावे, अशी मागणीही निवृत्त न्यायाधीशांनी केली आहे.

याप्रकरणी २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लक्ष घालण्याचे व याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. निवृत्त न्यायमूर्तींनी कोणत्या घटनेबाबत सरन्यायाधीशांना हे पत्र लिहिले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर भ्रष्टाचारप्रकरणी काही विरोधी नेत्यांवर कारवाई करण्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर हे पत्र त्यांनी लिहिल्याचे म्हटले जात आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस