राष्ट्रीय

सिक्कीममध्ये हिमस्खलन; निसर्ग सौदर्य पाहायला आलेल्या पर्यटकांवर काळाचा घाला

सिक्कीममध्ये झालेल्या हिमस्खलनात शेकडो पर्यटक अडकले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे

प्रतिनिधी

आज सिक्कीममध्ये मोठे हिमस्खलन झाल्याची घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये शेकडो पर्यटक अडकले असून ६ पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सिक्कीममधील नाथूला सीमावर्ती भागात हे हिमस्खलन झाले आहे.

भारतीय लष्कर, राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी तात्काळ बचाव मोहीम सुरु केली आहे. यादरम्यान, ६ जणांचा मृत्यू झाला असून हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अंदाजे १२.३०च्या सुमारास गंगटोक ते नाथू ला जोडणाऱ्या १५ व्या मैल जवाहरलाल नेहरू मार्गावर मोठे हिमस्खलन झाले. यामध्ये बर्फाच्या मोठ्या ढिगाखाली शेकडो पर्यटक अडकल्याचे सांगितले जात आहे.

आत्तापर्यत आलेल्या माहितीनुसार, २२ पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सिक्किम पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये ४ पुरुष, १ महिला आणि एका मुलाचा समावेश असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. दरम्यान, बर्फाच्या ढिगाने अडकलेला रास्ता मोकळा केल्यानंतर अडकलेल्या ३५० पर्यटक आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल