अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये  X - IndiaInNepal
राष्ट्रीय

अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये

अयोध्या ते नेपाळमधील जनकपूरदरम्यान सुरू झालेल्या नव्या थेट रेल्वेसेवेने मंगळवारी सुमारे ४०० भारतीय भाविक जनकपूरमध्ये दाखल झाले. रामायणाशी संबंधित दोन्ही शहरांना जोडणाऱ्या या रेल्वेसेवेमुळे भाविकांची ये-जा वाढण्याची अपेक्षा आहे.

Swapnil S

काठमांडू : अयोध्या ते नेपाळमधील जनकपूरदरम्यान सुरू झालेल्या नव्या थेट रेल्वेसेवेने मंगळवारी सुमारे ४०० भारतीय भाविक जनकपूरमध्ये दाखल झाले. रामायणाशी संबंधित दोन्ही शहरांना जोडणाऱ्या या रेल्वेसेवेमुळे भाविकांची ये-जा वाढण्याची अपेक्षा आहे.

‘सरयू-कमला एक्स्प्रेस’ उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि नेपाळमधील जनकपूरधाम यांना जोडते. अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान, तर जनकपूर हे सीतेचे जन्मस्थान मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी सोमवारी या रेल्वेसेवेचे आभासी उद्घाटन केले. अयोध्या कॅन्ट ते जनकपूरधामदरम्यान ६०४ किलोमीटरचा प्रवास सुमारे १९ तासांत पूर्ण होतो. ही रेल्वे आठवड्यातून एकदा धावणार असून, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरांमधून मार्गक्रमण करते.

जनकपूर रेल्वे स्थानकावर भाविकांचे नेपाळचे युवा, श्रम व रोजगारमंत्री रामजी यादव आणि मधेश प्रदेशचे मुख्यमंत्री सरोज कुमार यादव यांनी स्वागत केले. या रेल्वेसेवेमुळे भारत-नेपाळमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, तसेच पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी विवाह पंचमी उत्सवासाठीही या सेवेमुळे भाविकांना जनकपूरला पोहोचणे सोयीचे होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू

आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा

रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?

Pune : बनावट औषधप्रकरणी इंडुकेअरचे परवाने रद्द; उत्पादन, पॅकिंग, तपासणी व वितरण तातडीने बंद करा, FDA चे आदेश