अयोध्या येथील रावत मंदिराचे मुख्य पुजारी महंत राम मिलन दास यांचे गूढ निधन 
राष्ट्रीय

अयोध्येत ८ कोटींची जमीन विकणाऱ्या महंतांचे गूढ निधन

अयोध्या येथील रावत मंदिराचे मुख्य पुजारी महंत राम मिलन दास यांचे शनिवारी संध्याकाळी अचानक गूढरीत्या निधन झाले. जेवणानंतर अचानक त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यांच्या शिष्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.

Swapnil S

अयोध्या: येथील रावत मंदिराचे मुख्य पुजारी महंत राम मिलन दास यांचे शनिवारी संध्याकाळी अचानक गूढरीत्या निधन झाले. जेवणानंतर अचानक त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यांच्या शिष्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. अयोध्येच्या रामघाट परिसरात महंतांची जमीन होती, जी त्यांनी दोन महिन्यांपूर्वी ८ कोटी रुपयांना विकली होती. त्यांच्या खात्यात हे पैसे आले होते. त्यापूर्वी त्यांच्या खात्यात आधीच १.५ कोटी रुपये होते. पोलिसांनी सांगितले की, महंतांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जमीन विकल्यानंतर मिळालेले पैसे या मृत्यूमागील कारण होते का हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महंतांची सेवा करणारी दासी शकुंतला (४०) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शकुंतला १३ वर्षांपासून महंतांची सेवा करत होती. तिच्या आईने यापूर्वी आश्रमात सेवा केली होती. महंत राम मिलन दास (४८) हे १५ वर्षांपासून रावत मंदिराचे महंत होते.

मुंबईकरांनो लक्ष द्या! पांजरापूर पंपिंग स्टेशनमध्ये ‘तांत्रिक बिघाड’; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

विरारमध्ये ‘वचनपूर्ती जल उत्सव’ कार्यक्रमासाठी रस्ता अडवल्याने गोंधळ; भाजप, बविआ आणि नागरिकांमध्ये संघर्ष

Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; तातडीने रुग्णालयात दाखल

Thane News : कबूतराला वाचवायला गेला, अग्निशामक जवानाने जीव गमावला; २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ

बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का; IRCTC घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित, RJD समोर दुहेरी संकट