राष्ट्रीय

बालेंद्र शहा सत्तेत येताच के. पी. शर्मा ओली गेले तुरुंगात; नेपाळ-जेन-झी आंदोलनासंदर्भात कारवाई

नेपाळमध्ये गेल्या वर्षी झालेल्या 'जेन-झी' आंदोलनावरील दडपशाही प्रकरणाचा अहवाल नेपाळमधील बालेंद्र शहा यांच्या नव्या सरकारने लागू केल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली.

Swapnil S

काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या वर्षी झालेल्या 'जेन-झी' आंदोलनावरील दडपशाही प्रकरणाचा अहवाल नेपाळमधील बालेंद्र शहा यांच्या नव्या सरकारने लागू केल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली.

सीपीएन-यूएमएल अध्यक्ष असलेल्या ओली यांना काठमांडूपासून १२ किमी अंतरावर असलेल्या भक्तपूर जिल्ह्यातील गुंडू परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे माजी गृहमंत्री आणि नेपाळी काँग्रेसचे नेते रमेश लेखक यांनाही त्यांच्या कटुंजे येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे.

'जेन झी' आंदोलनादरम्यान आंदोलकांवर करण्यात आलेल्या हिंसक कारवाईत ७६ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन डझनहून अधिक तरुणांचा समावेश होता. या प्रकरणी गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची शिफारस तपास आयोगाने केली होती.

ओली यांच्या अटकेनंतर त्यांच्या 'सीपीएन-यूएमएल' पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाने या कारवाईचा निषेध केला असून ओली यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी ३ वाजल्यापासून देशभर निदर्शने करण्याची घोषणा पक्षाने केली. तसेच रविवारी सर्व ७७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निषेध पत्रे सोपवली जाणार आहेत.

एसटीची 'ग्रुप ऑफर' हिट! गणेशोत्सवासाठी ३० टक्के अधिभार रद्द केल्याने कोकणासाठी ५,१८४ बसेस फुल्ल

समृद्धी महामार्ग होणार 'स्मार्ट'! AI कॅमेऱ्यांच्या उभारणीला सुरुवात; नागपूरपासून २५० किमीच्या टप्प्यांत काम

Mumbai : चर्चेविना २० हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर; विरोधकांचा सभागृहातून सभात्याग; महापालिका सभागृहाबाहेर प्रतिसभागृह

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर शौचालयांचा अभाव; नगरसेवकांचा सभागृहात प्रशासनावर हल्लाबोल

Mumbai : कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात; कार-टॅक्सीची जोरदार धडक