केळी शेतकरी, व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान; युद्धाचा फटका, जहाज कंपन्यांची दरवाढ 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

केळी शेतकरी, व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान; युद्धाचा फटका, जहाज कंपन्यांची दरवाढ

तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धाचा फटका देशातील सामान्य शेतकरी आणि कृषी माल विक्रेत्यांना बसला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धाचा फटका देशातील सामान्य शेतकरी आणि कृषी माल विक्रेत्यांना बसला आहे. केळीची निर्यात करणाऱ्यांचे तर पूर्ण कंबरडे मोडले असून देशोधडीला लागल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात आखातात जाणारे १२०० ते १५०० हजार  कंटेनर जेएनपीए बंदरात अडकून पडले होते. १५ दिवसांनंतर यातील ८०० ते १ हजार कंटेनर मार्गस्थ झाले. तर काही कंटेनरमधील माल स्थानिक बाजारपेठेत विकण्यासाठी आणला गेला.

दरम्यान, इराणमध्ये कंटेनर पाठविल्यानंतर तिथे युद्धाचा आधार घेत माल उतरवण्यासाठी व साठवणूक करण्यासाठी शिपींग कंपन्यांनी आव्वाच्चा सव्वा भाडे लावण्यास सुरवात केली. पूर्वी एका कंटेनरला २ ते ३ लाख असलेले भाडे थेट १५ लाख रूपयांपर्यंत पोचले. याचा फटका शेतकरी आणि निर्यातदार कंपन्यांना बसला. यातून हजारो टन केळी आहे त्या जागी सडून गेली आणि ज्या केळीची निर्यात झाली त्यांना विदेशातील स्थानिक शिपिंग कंपन्यांनी अधिकचे भाडे लावल्याने हाती काहीही लागले नाही. 

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद