राष्ट्रीय

रिलेशनशिप गोल्सचा नवा बेंचमार्क; गर्लफ्रेंडच्या २६ व्या वाढदिवशी पठ्ठयाने पकडला वेगळाच 'रस्ता', Video पाहून नेटकरी भावुक, म्हणाले...

फुले, चॉकलेट्स, केक किंवा डिनर, वाढदिवस साजरा करण्याचे कितीतरी मार्ग असतात. पण बंगळुरूमधील अविक भट्टाचार्य नावाच्या तरुणाने आपल्या पार्टनरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी...

किशोरी घायवट-उबाळे

फुले, चॉकलेट्स, केक किंवा डिनर, वाढदिवस साजरा करण्याचे कितीतरी मार्ग असतात. पण बंगळुरूमधील अविक भट्टाचार्य नावाच्या तरुणाने आपल्या पार्टनरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षरशः वेगळाच 'रस्ता' पकडला. त्याने केलेले खास सरप्राईज पाहून सोशल मीडियावर लोक भावूक झाले असून, अनेकांनी याला "रिलेशनशिप गोल्सचा नवा बेंचमार्क" म्हटले आहे.

गर्लफ्रेंड २६ वर्षांची झाली म्हणून...

अविकने आपल्या गर्लफ्रेंड सिमरनच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त २६ किलोमीटर धावण्याचे ठरवले. त्याचा हा भावनिक व्हिडिओ @simranxavik या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तो झपाट्याने व्हायरल झाला.

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सिमरन सांगते की, ती स्वतः तिच्या वाढदिवशी २६ किमी धावणार होती पण तब्येत बिघडल्यामुळे तिला ते शक्य झाले नाही. अविकने तिच्यासाठी ही इच्छा पूर्ण केल्याचे पाहून ती म्हणते, "या माणसाची बरोबरी कशी करायची, तेच मला कळत नाही."

मी तिच्यासाठी २६ किमी धावतोय...

त्यानंतर अविकचा व्हिडीओ सुरु होतो. तो कॅमेऱ्यासमोर त्याच्या भावना व्यक्त करत म्हणतो,
“माझी गर्लफ्रेंड २६ वर्षांची झाली, म्हणून आज मी तिच्यासाठी २६ किमी धावतोय.”

व्हिडीओनुसार, अविक धावतांना अधूनमधून शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करत म्हणतो, "मी मुद्दाम हेडफोन न लावता धावलो, जेणेकरून मी पूर्णपणे सिमरनसोबत घालवलेल्या गोड क्षणांच्या आठवणींवर लक्ष केंद्रित करू शकेल."

मुंबई मॅरेथॉनसाठी दोघेही सज्ज

व्हिडिओत अविक सांगतो की, या धावण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे आम्ही दोघेही फक्त अडीच आठवड्यांवर असलेल्या मुंबई मॅरेथॉनची तयारी करत आहोत. प्रशिक्षणाची सुरु असूनही तरीही अविकने केलेली रनिंग पूर्णपणे सिमरनला अर्पण केली.

सिमरनचं आरोग्य चांगलं राहो...

धावत असताना अविक म्हणाला, “सिमरनचं आरोग्य चांगलं राहो, कारण निरोगी राहणं हा प्रत्येक गोष्टीचा पाया आहे." हा भावनिक क्षण व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांच्या मनाला भिडला.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर होताच अविकवर कौतुकाचा वर्षाव झाला. एका युजरने लिहिले,
“Bro setting standards.” दुसऱ्या युजरने म्हटले, “हा व्हिडिओ पाहून माझा कंठ दाटून आला.” एकाने मजेशीर कमेंट करत म्हटले, “माझ्या मानसिक शांततेसाठी मी हे AI समजणार.” एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “आता ‘नो वे’ हे २६ वेळा लिहू की काय? म्हणजे अख्ख्या जगात असा माणूस कुठे मिळतो, खरंच कमाल!

५ जानेवारी २०२६ ला शेअर झालेल्या या व्हिडिओला ७.५ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि ६.८ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?