राष्ट्रीय

प्रीमियम बुटासाठी बाटा, आदिदासची चर्चा

भविष्यात नफ्यासहित वाढीसाठी आराखडा तयार केला आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : ‘बाटा’ ही नाममुद्रा भारतीयांच्या मनामनात वसली आहे. बाटाची चप्पल किंवा बूट नागरिक डोळे झाकून घेतात. याच बाटाने आता आंतरराष्ट्रीय खातीच्या आदिदास या नाममुद्रेसोबत प्रीमियम श्रेणीचे बूट बनविण्यासाठी चर्चा सुरू केली आहे.

बाजारात ही बातमी पसरताच बाटाच्या समभागात वाढ होऊन तो ५.३० टक्क्याने वाढून १७३३.७५ रुपयांवर बंद झाला.

भारतीय बूट बाजारात बाटाचे नाव असले तरीही क्रीडाशी संबंधित बुटांची चाचणी कंपनीने सुरू केली. आदिदासची या क्षेत्रातील कामगिरी पाहता बाटाने आदिदासशी चर्चा सुरू केली.

बाटा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ गुंजन शहा म्हणाले की, कॅज्युएल व प्रीमियम या क्षेत्रात रिटेल नेटवर्कचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. भविष्यात नफ्यासहित वाढीसाठी आराखडा तयार केला आहे. ग्राहकांना नवनवीन अनुभव देण्यात कंपनी कायमच अग्रेसर राहिली आहे. आम्ही टियर ३ व ५ शहरात विस्तार करू इच्छितो, असे त्यांनी सांगितले.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान