राष्ट्रीय

'या' कारणाने आपचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा निलंबीत ; चढ्ढांनी मात्र आरोप फेटाळले

विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या या दोन्ही खासदारांचं राज्यसभेतून निलंबन करण्यात आलं आहे.

नवशक्ती Web Desk

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार खासदार संजय सिंह यांच्यानंतर आता आपचे खासदार राघव चढ्ढा यांना साज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. तसंच संजय सिंह यांच्यादेखील अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. त्यांच्या निलंबनाची मुदतवाढ करण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या या दोन्ही खासदारांचं राज्यसभेतून निलंबन करण्यात आलं आहे.

राज्यसभेच्या पाच खासदारांनी केलेल्या दाव्यावरुन राघव चढ्ढा यांच निलंबन करण्यात आलं आहे. राज्यसभेतील पाच खासदारांनी दावा केला की, त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. राघव चढ्ढा यांनी हा प्रस्ताव मांडला होता. यात भारतीय जनता पक्षाचे तीन तर बीजेडी आणि एआयएडीएमकेच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. यांनी या गोष्टीचा निषेध नोंदवला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

खासदार राघव चढ्ढा यांनी मात्र त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. हे आरोप खोटे असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषाधिकार समितीनं पाठवलेल्या नोटीसला उत्तर देऊ असं देखील चढ्ढा म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खासदार म्हणून आपली प्रतिमा खराब करण्याचा भाजपचा डाव असून या डावपेचांचा मी पर्दाफाश करणार आहे. तर आपने चढ्ढा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला 'कट' असं म्हटलं आहे. राघव चढ्ढा या तरुण आणि प्रभावी खासदाराची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी भाजप ही मोहीम राबवत असून त्याचा निषेध करतो, असं आम आदमी पक्षाच्या वतिने म्हटलं गेलं आहे.

Pune Accident : कोरेगाव पार्क परिसरात भीषण दुर्घटना; भरधाव कारची मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक, गाडीचे झाले तुकडे, २ भावांचा जागीच मृत्यू |Video

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

जयपूर हादरले! सहावीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; शाळेतल्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, CCTV कॅमेऱ्यात थरारक घटना कैद

Women’s World Cup : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महिला विश्वचषक फायनलसाठी हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द

मांडवा जेट्टी कोसळण्याच्या उंबरठ्यावर? प्रवाशांचा जीव धोक्यात; सागरी मंडळाचे दुर्लक्ष