राष्ट्रीय

Rajasthan CM: भाजपचे धक्कातंत्र सुरुच, वसुंधरा राजेंना डच्चू; भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोघांच्या नावाची उपमुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे.

Rakesh Mali

भाजप आपल्या धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला तीन राज्यात मोठं यश मिळालं. यात मध्य प्रदेशात विजयाचे शिल्पकार असलेल्या शिवराज सिंह चौहान यांना नारळ देत नवख्या मोहन यादव यांना मुख्यमंत्री केलं. आता असाच धक्का राजस्थानमध्ये देखील मिळाला आहे. भाजपकडून राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा नाव घोषीत करण्यात आलं आहे. भजनलाल शर्मा यांना राजस्थानचे नवे मुख्यमंत्री घोषीत करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांच्या ऐवजी भजनलाल यांना मुख्यमंत्री करुन भाजपने सर्वांना धक्का दिला आहे.

तीन राज्यात भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर मध्य प्रदेशात शिवराज सिंह जौहान आणि राजस्थानमध्ये वसंधुरा राजे यांच्या नावाची जोदरार चर्चा होती. मात्र भाजपने या दोन्ही राज्यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.राजस्थानची राजधानी जयपूर इथं राजस्थान भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत भजनलाल शर्मा यांचं नाव पुढे आलं आहे. वसुंधरा राजे यांनी स्वत: भजनलाल यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे.

दरम्यान, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोघांच्या नावाची उपमुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे. हे दोघांची नावे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्तीत आघाडीवर होती.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री