प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

इंटरपोलच्या धर्तीवर ‘भारतपोल’ सुरू

देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांना पकडण्यासाठी आजमितीस इंटरपोलची मदत घेतली जात होती.

Swapnil S

नवी दिल्ली : देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांना पकडण्यासाठी आजमितीस इंटरपोलची मदत घेतली जात होती. आता इंटरपोलच्या धर्तीवर भारत सरकारने 'भारतपोल' स्थापन केले आहे. इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही 'भारतपोल' सुरू करण्यात आल्याने आता पोलिसांचा थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआयच्या या ‘भारतपोल पोर्टल’चे उद‌्घाटन केले. सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हे, मानवी तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हे आदी गुन्ह्यांतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पोर्टलचा वापर होणार आहे.

भारतपोल पोर्टलद्वारे वेगवेगळ्या राज्यांतील पोलीस गुन्हेगारांची अद्ययावत माहिती मिळवू शकणार आहेत. हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे. असे असले तरी राज्यांचे पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोलची मदत घेऊ शकणार आहेत.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

एकीकडे नवजात बाळाचा जन्म, दुसरीकडे जवान पतीचे अंत्यदर्शन; साताऱ्यातील काळीज पिळवटून टाकणारा Video व्हायरल

भटक्या कुत्र्यांसाठी मिका सिंगची सर्वोच्च न्यायालयाला विनंती; १० एकर जमीन दान करण्याची तयारी

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

Bigg Boss Marathi 6 च्या घरात कोण कोण? फायनल यादी पाहा