राष्ट्रीय

Bihar Caste Census : बिहारमध्ये ओबीसी सर्वाधिक ; नितीश कुमार सरकारने केले जातीय निहाय जनगणनेचे आकडे जाहीर

बिहार सरकारने पुढाकार घेत केलेली जातीय जनगणनेमुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा मंडल राजकारणाची एन्ट्री झाली असल्याचं बोललं जात आहे.

नवशक्ती Web Desk

देशात जातीय निहाय जनगणनेची मागणी होत असताना बिहार सरकारने याबाबत पुढाकर घेतला आहे. बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारने जातीय निहाय जणना सर्व्हेची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात पहिल्यांदा एखाद्या राज्याकडून याप्रकारची जनगणना जाहीर केली आहे. बिहार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये ओबीसींची संख्या ६३ टक्के आहे. तर २७ टक्के संख्या मागात तर ३६ टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या १९ टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ २ टक्के आहे.

बिहार सरकारने पुढाकार घेत केलेली जातीय जनगणनेमुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा मंडल राजकारणाची एन्ट्री झाली असल्याचं बोललं जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये जाती निहाय जनगणनेची मागणी होत आहे. बिहारमध्ये जातीय निहाय जनगणना करणे हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मास्टरट्रोक मानला जात आहे. या जनगणनेनुसार बिहारच्या राजकारणात ओबीसींना अधिक महत्व येणार असल्याचं बोललं जात आहे.

बिहार सरकारने जाहीर केलेली आकडेवारी नुसार बिहारमध्ये १३ कोटी लोकसंख्या आहे. यात सर्वाधिक म्हणजे ८१.९ टक्के लोकसंख्या हिंदू आहे. तर १७.७ टक्के मुस्लीम आहे. बिहार राज्यात ख्रिश्चन ०.०५ टक्के, तर शिख ०.०१ टक्के आहे. बौद्धांची संख्या ०.०८, तर जैन ०.००९६ टक्के आहे. तसंच इतर धर्मीयांची संख्या बिहारमध्ये ०.१२ टक्के आहेत.

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब