राष्ट्रीय

Shocking! 'रिल्स' बनवण्यापासून रोखले, पत्नीने पतीला कायमचे संपवले

महेश्वर कोलकात्याला परतण्यापूर्वी सासरी आपल्या पत्नीला भेटायला गेला होता. यावेळी वाद झाल्याने त्याच्या पत्नी आणि सासरच्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Rakesh Mali

लहान मुलांना मोबाईल न दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या किंवा वाचल्या आहेत. मात्र, बिहारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेगुसरायमधील खोडबंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फफौत गावात एकाने पत्नीला रिल्स बनवण्यापासून रोखल्याने पत्नीने त्याची हत्या केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (7 जानेवारी) रात्री 9 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेतील मृत पतीचे नाव महेश्वर कुमार असे असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील नरहान गावचा रहिवासी आहे. त्याचे फफौत गावातील राणी कुमारीशी 6 ते 7 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. महेश्वर हा कोलकाता येथे मजुरीचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता. राणी ही माहेरी गेली होती. ती काही दिवसांपासून इंस्टाग्राम रिल्स बनवत होती. त्यावरुन या दोघांमध्ये वाद होत होते. महेश्वर तिला रिल्स बनवायला विरोध करत होता. मात्र, ती त्याचे काही एक ऐकायला तयार नव्हती.

रिल्स बनवायला विरोध केल्याने केली हत्या-

रविवारी महेश्वर हा राणीला भेटायला सासरी गेला होता. यावेळी दोघांमध्ये रिल्स बनवण्यावरुन कडाक्याचे भांडण झाले. महेश्वर रिल्स बनवायला विरोध करत असल्याने राणीचा संताप अनावर झाला. तिने माहेरच्यांच्या मदतीने त्याची गळा दावून हत्या केली. रात्री 10:30 वाजेच्या सुमारास महेश्वरचा भाऊ रुदलने त्याला फोन केला. मात्र, फोन दुसऱ्याने उचलल्याने त्याचा संशय बळावला. त्याने त्याच्या वडिलांना ताबडतोब फफौत गावात जाण्यास सांगितले. ते फफौतमध्ये पोहचल्यावर महेश्वर त्यांना मृत अवस्थेत आढळून आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांकडून तपास सुरु-

महेश्वर कोलकात्याला परतण्यापूर्वी सासरी आपल्या पत्नीला भेटायला गेला होता. यावेळी वाद झाल्याने त्याच्या पत्नी आणि सासरच्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री