बिहारमधील ‘हॉट सीट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राघोपूरमध्ये सुरुवातीला तेजस्वी यादव अनेक फेऱ्यांत मागे पडत होते. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात परिस्थिती बदलली. २२व्या फेरीपर्यंत त्यांनी ८,५२३ मतांची आघाडी घेतली आणि २३व्या फेरीत ही आघाडी वाढून ११,४८१ मतांपर्यंत पोहोचली.
“आज बिहारच्या जनतेनं एनडीएला आशीर्वाद दिला आहे…बिहारमधील या ऐतिहासिक विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्ञान—गरीब, युवा, अन्नदाता, नारी—यांच्या विकासासाठी असलेल्या कटिबद्धतेला जातं. ‘तुम्ही (कार्यकर्त्यांनी) काम करत राहा, जनता तुम्हाला आशीर्वाद देईल,’ असा त्यांचा संदेश होता… अनेक अशा योजना आहेत ज्या जात-धर्म न पाहता सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या, आणि त्याचाच परिणाम म्हणून आज बिहारच्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला आहे, असे बिहार भाजप प्रभारी विनोद तावडे म्हणाले.
बिहार निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. सर्व निकाल जाहीर झाले नसले तरी सर्व जागांवरचे ट्रेंड्स हाती आले असून एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं दिसतंय. एनडीए २०४ जागांवर आघाडीवर आहे, तर महागंठबंधन अवघ्या ३२ जागांवर आघाडीवर आहे.
एनडीएने कलांमध्ये बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतर काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली आहे. "या निकालासाठी एक व्यक्ती जबाबदार आहे - ज्ञानेश कुमार. मी त्यांचे अभिनंदन करतो. ६५ लाख मते काढून टाकण्यात आली आणि २१ लाख मतदार जोडले गेले. ही जादू ज्ञानेश कुमार यांनी केली... ज्ञानेश कुमार यांनी एकट्याने सर्व प्रयत्न केले. त्यांचे अभिनंदन..." असे ते म्हणाले.
राघोपूर मतदारसंघात राजदचे तेजस्वी यादव यांना भाजपच्या सतीश कुमार यांच्याकडून चांगली टक्कर मिळत आहे. मतमोजणीच्या अकराव्या फेरीनंतर तेजस्वी यादव पुन्हा एकदा पिछाडीवर गेले आहेत. तब्बल ४७२९ मतांसह भाजपचे सतीश कुमार पुढे आहेत. कुमार यांना अकराव्या फेरीपर्यंत ४४,९२९ मते तर तेजस्वी यांना ४०,१०० मते मिळाली आहेत. तेजस्वी यादव यांचा पराभव झाल्यास तो राजदसाठी आणि महागठबंधनसाठीही मोठा धक्का ठरू शकतो. पण, अखेरच्या क्षणी तेजस्वी आघाडी घेऊन विजयी ठरतील अशी शक्यता आहे.
बिहार निवडणुकीत एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतर, आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले, "मतमोजणी सुरू आहे. पण महागठबंधनच्या सर्व उमेदवारांना मला सांगायचं आहे की, एक मानसिक खेळही सुरू आहे. सुरूवातीला त्यांची (विरोधक) जमेची बाजू असलेल्या ठिकाणांची मतमोजणी झाली आहे. ६५ ते ७० पेक्षा जास्त जागांवर ३०००-५००० पेक्षा कमी मतांचे अंतर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्या जागांवर परिस्थिती बदलू शकते... मतमोजणी अत्यंत हळू सुरू आहे...निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उशीराने माहिती अपडेट केली जात आहे. हा फक्त सुरुवातीचा ट्रेंड आहे; आम्ही असे ट्रेंड बदलताना आणि पलटतानाही बघितले आहेत."
मतमोजणीच्या कलांमध्ये एनडीने स्पष्ट बहुमत ओलांडले असून आता 'डबल सेंच्युरी'च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ताज्या ट्रेंड्सनुसार, १९९ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. दुसरीकडे, महागठबंधनची 'हाफ सेंच्युरी'साठीही कसरत सुरू असल्याचं दिसतंय. ट्रेंड्समध्ये अवघ्या ३८ जागांवर महागठबंधन आघाडीवर आहे.
अलीनगरमधून आघाडीवर असलेल्या गायिका आणि भाजप उमेदवार मैथिली ठाकूर म्हणाल्या - "लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे याचा मला खूप आनंद आहे. हा फक्त माझा विजय नाही. हा विजय त्यांचाही आहे...नितीश कुमार यांनी महिलांसाठी केलेल्या कामाचा माझ्या प्रवासात खूप फायदा झाला. लोकं पंतप्रधान मोदींवर खूप प्रेम करतात आणि त्यांचा एनडीएवर खूप विश्वास आहे. ते (अलीनगर) निश्चितच सीतानगर होईल..."
लखनऊ - "बिहारच्या लोकांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही बिहारमध्ये दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत. २० वर्षांपासून लोकांची सेवा करणाऱ्या 'सुशासन'वर लोकांनी शिक्कामोर्तब केले आहे..." असे बिहारच्या कलांमध्ये एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतर उत्तर प्रदेशचे मंत्री नितीन अग्रवाल म्हणाले. विरोधी पक्षाच्या टीकेवर उत्तर देताना, "जेव्हा तुम्ही अशी आश्वासने देता जी पूर्ण करणे पूर्णपणे अशक्य असते, तेव्हा लोकांना सर्वकाही समजते. त्यांनी ती पूर्णपणे नाकारली आहेत..." असेही ते म्हणाले.
बिहार: भाजप कार्यकर्ते पंतप्रधान मोदींचा चेहरा असलेला रथ घेऊन आले आहेत, पाटण्यात त्यांचा जल्लोष सुरू आहे. ट्रेंड्समध्ये एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आहे; भाजप ८७ जागांवर आघाडी घेऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. यावेळी "धैर्य रखो मेरे भगवान मोदी पर" असे एक कार्यकर्ता म्हणाला.
राघोपूर मतदारसंघातून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अखेर सहाव्या फेरीनंतर आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीनंतर केवळ २१९ मतांनी ते पुढे आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या कलांनी एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष बराच मागे आहे. दरम्यान, राजद नेत्या सारिका पासवान यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्या म्हणाल्या, "अशा ६०-७० जागा आहेत जिथे आम्ही १००-२०० मतांनी मागे आहोत. त्यामुळे, हे कल निश्चित नाहीत. पिक्चर अभी बाकी है. निकाल बदलतील; आम्हाला अजूनही आशा आहे."
लखनऊ (उत्तर प्रदेश): भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या मतमोजणीच्या ट्रेंडवर म्हटले आहे की, "भाजप-एनडीए जवळजवळ १९२ जागांवर आघाडीवर आहे आणि महागठबंधन ५० पेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहे. यावरून हे स्पष्ट होते की बिहारच्या जनतेने महागठबंधनचा सुपडा साफ केला आहे... या निवडणुकीत लोकांनी केवळ महायुतीला नाकारले नाही तर घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध मोहोर उमटवली आहे."
निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार एनडीए १८५ जागांवर आघाडीवर आहे तर जेडी(यू) ८१ जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे पाटण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ "बिहार का मतलब नितीश कुमार" असे लिहिलेले फलक लावण्यात आले आहेत.
बेतिया, पश्चिम चंपारण (बिहार): भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ च्या मतमोजणीच्या ट्रेंडवर म्हटले आहे की, "मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की एनडीए मोठ्या बहुमताने निवडणुका जिंकेल आणि आता चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे की एनडीए मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेत येत आहे. महाआघाडीने फक्त दावे केले होते... प्रशांत किशोर यांच्यासोबत जे व्हायला हवं होतं तेच झालं... लोकांमध्ये त्यांचा कोणताही प्रभाव नव्हता..."
लखनऊ: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, "बिहारमधील कल सध्या एनडीएच्या बाजूने आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा हा निकाल खूपच चांगला आहे... आम्ही या ट्रेंडचे स्वागत करतो. विरोधक मुद्देहीन आहेत..."
सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला असून १८५ जागांवर आघाडीवर आहे. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी पाटणा येथील जद(यू) कार्यालयासमोर जल्लोष केला. (जेडी(यू) ७६, भाजप ८३, एलजेपी(आरव्ही) २२, एचएएमएस ४)
नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष ८३ जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. गेल्या निवडणुकीत नितीश यांच्या पक्षाला केवळ ४३ जागा होत्या. सर्वात मोठा पक्ष ठरण्यासाठी जेडीयू आणि भाजपमध्येच 'कांटे की टक्कर' दिसत आहे.
आतापर्यंतच्या कलांवरून बिहारमध्ये एनडीएच्या बाजूने मतदारांनी पारडं टाकल्याचं दिसतंय. एनडीए १९० जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन ५० जागांवर आघाडीवर आहे.
बिहारमधील २४३ जागांसाठी एकूण ६७.१३ टक्के मतदान झाले, ज्यामध्ये ६२.८ टक्के पुरुष आणि ७१.६ टक्के महिला मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने १९५१ नंतरचा हा सर्वाधिक मतदानाचा टप्पा असल्याचे नोंदवले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या एकूण ४६ मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन अत्यंत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहे.