राष्ट्रीय

बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात नितीशकुमार सरकारमधील मंत्री आणि जेडीयू नेते श्रवण कुमार यांच्या ताफ्याचा पाठलाग करून काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. ज्यामध्ये मंत्र्यांचा अंगरक्षक जखमी झाला आहे.

Swapnil S

नालंदा : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात नितीशकुमार सरकारमधील मंत्री आणि जेडीयू नेते श्रवण कुमार यांच्या ताफ्याचा पाठलाग करून काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. ज्यामध्ये मंत्र्यांचा अंगरक्षक जखमी झाला आहे. हिलसा पोलीस स्टेशन परिसरातील मलावा गावात ही घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मंत्री आले होते.

याच दरम्यान, मंत्र्यांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ला केला. या लोकांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत ताफ्याचा पाठलाग केला. सध्या गावात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई