माहेरी गेलेली बायको परत आली नाही म्हणून मेहुणीलाच पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

माहेरी गेलेली बायको परत आली नाही म्हणून मेहुणीलाच पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

बिहारच्या सारण जिल्ह्यात पत्नीने माहेराहून परत येण्यास नकार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने अल्पवयीन मेव्हणीला फूस लावून पळवून नेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

Mayuri Gawade

पती-पत्नीमधील वादातून अनेकदा विचित्र घटना समोर येतात, पण बिहारच्या सारण जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. माहेरी गेलेल्या पत्नीने पतीसोबत सासरी जाण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून संतापलेल्या जावयाने चक्क आपल्या अल्पवयीन मेहुणीलाच फूस लावून पळवून नेले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, सारण जिल्ह्यातील सोनपूर दियारा परिसरातील एका कुटुंबाने वर्षभरापूर्वी आपल्या मोठ्या मुलीचे सारण जिल्ह्यातील एका युवकासोबत मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले होते. लग्नानंतर संबंधित महिला काही दिवसांसाठी माहेरी आली होती. दरम्यान १९ जून रोजी जावई तिला परत सासरी घेऊन जाण्यासाठी सासरी आला होता. मात्र, काही कौटुंबिक कारणांमुळे किंवा वादामुळे त्यावेळी कुटुंबीयांनी लेकीला पाठवण्यास नकार दिला.

संधी साधत मेहुणीलाच घेऊन फरार

कुटुंबीयांच्या आरोपानुसार, पत्नीला सोबत घेऊन जाता न आल्याने जावई नाराज झाला होता. त्यानंतर त्याने घरातील अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले. २२ जून रोजी संधी साधून त्याने आपल्या अल्पवयीन मेहुणीला फूस लावून तिला पळवून नेल्याचा आरोप आहे.

मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर आणि जावईही संपर्कात नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. सुरुवातीला नातेवाईक आणि ओळखीच्या ठिकाणी दोघांचा शोध घेण्यात आला. मात्र, काहीच माहिती न मिळाल्याने अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पीडित कुटुंबाने सोनपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधित जावयाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून, दोघांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास आणि शोधमोहीम सुरू केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती