जन्ममृत्यू नोंदींबाबत नवे सुधारणा ‌विधेयक प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

जन्ममृत्यू नोंदींबाबत नवे सुधारणा ‌विधेयक

देशात जन्म आणि मृत्यूची उशिरा होणारी नोंदणी रोखण्याच्या उद्देशाने बुधवारी लोकसभेत ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२६’ सादर करण्यात आले.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात जन्म आणि मृत्यूची उशिरा होणारी नोंदणी रोखण्याच्या उद्देशाने बुधवारी लोकसभेत ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२६’ सादर करण्यात आले. नव्या सुधारणेनुसार, जन्म किंवा मृत्यूची नोंदणी दोन वर्षांच्या आत न केल्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे अर्ज करून नोंदणीसाठी संमती मिळवावी लागणार आहे.

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृहात सादर केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने २० जुलै रोजी या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ (ज्यात २०२३ मध्ये सुधारणा करण्यात आली होती) मधील कलम १३(३) मध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. १ वर्षापर्यंत उशीर असल्यास विद्यमान नियमांनुसार प्रक्रिया सुरू राहील. १ वर्षापेक्षा जास्त मात्र २ वर्षांच्या आत अर्ज केल्यास, जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा अधिकृत कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी व मंजुरीनंतर नोंदणी केली जाईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती