राष्ट्रीय

दहा दिवसांपूर्वी मंत्री झालेला भाजप उमेदवार काँग्रेसकडून पराभूत

Swapnil S

जयपूर : राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला महिनाभरातच काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे निवडणूक न झालेल्या करणपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला महिनाभरातच मोठा धक्का बसला आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे निवडणूक न झालेल्या करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना भाजपने या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, टीटी यांना काँग्रेसचे उमेदवार रूपिंदर सिंह कुनूर यांनी १२ हजार ५७० मतांनी पराभूत केले आहे.

या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुनूर यांचं निधन झाल्याने करणपूर येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राजस्थानमध्ये १९९ जागांसाठीच मतदान घेण्यात आले होते, तर करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतेच मतदान झाले होते. त्यात मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला आहे. सुरेंद्र पाल सिंह टीटी यांनी दहा दिवसांपूर्वीच राजस्थान सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्यांच्या सरकारमध्ये सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आले होते. मात्र, आजच्या पराभवामुळे त्यांचे मंत्रिपद औटघटकेचे ठरले आहे.

दरम्यान, या मतदारसंघातील संपूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसचे उमेदवार रूपिंदर सिंह कुनूर यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना सांगितले की, श्रीकरणपूर मतदारसंघातील विजयी उमेदवार रूपिंदर सिंह कुनूर यांचे अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. हा विजय दिवंगत गुरमित सिंह कुन्नूर यांना समर्पित आहे. श्रीकरणपूर येथील जनतेने भाजपच्या अहंकाराला पराभूत केले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त