५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक खर्च; एकट्या बंगालमध्ये खर्च केले २८६.९९ कोटी रुपये, खर्च विवरणपत्रावरून माहिती उघड  
राष्ट्रीय

५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक खर्च; एकट्या बंगालमध्ये खर्च केले २८६.९९ कोटी रुपये, खर्च विवरणपत्रावरून माहिती उघड

भारतीय जनता पक्षाने एकट्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २८६.९९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने एकट्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २८६.९९ कोटी रुपये खर्च केले आहेत. हा खर्च काँग्रेस पक्षाने यावर्षी झालेल्या पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडणुकांमध्ये केलेल्या एकूण २४८.५५ कोटी रुपयांच्या खचपिक्षा अधिक आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या खर्च विवरणपत्रावरून समोर आली आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील भाजपच्या एकूण ५२९.३८ कोटी रुपयांच्या निवडणूक खर्चापैकी निम्म्याहून अधिक खर्च एकट्या पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. भाजपने बंगालमध्ये सामान्य प्रचारावर

२१७.१६ कोटी रुपये आणि उमेदवारांवर ६९.८३ कोटी रुपये खर्च केले. पश्चिम बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभूत करत पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली. घोषित झालेल्या २९३ जागांपैकी भाजपने २०७ जागा जिंकल्या, तर तृणमूल काँग्रेसला ८० जागा मिळाल्या.

केरळमधील चित्र वेगळे

पक्षांनी जाहीर केलेल्या खर्चाच्या आधारे केरळमध्ये वेगळी परिस्थिती दिसून येते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचा पराभव केला. यामध्ये काँग्रेसने ६३ आणि माकपने २६ जागा जिंकल्या, तर भाजपला ३ जागा मिळाल्या. काँग्रेसने आपल्या मुख्यालय आणि राज्य युनिटद्वारे केरळमध्ये १०५.३४ कोटी रुपये खर्च केले, जे भाजपच्या ८२.६७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत. काँग्रेसच्या खर्चापैकी ७१.३० कोटी रुपये सामान्य प्रचारावर आणि ३४.०५ कोटी रुपये उमेदवारांवर खर्च झाले. भाजपने केरळमध्ये सामान्य प्रचारावर ५४.९३ कोटी रुपये आणि उमेदवारांवर २७.७४ कोटी रुपये खर्च केल्याचे अहवालात म्हटले आहे.

तृणमूलचे विवरणपत्र अद्याप सार्वजनिक नाही

राज्यात मर्यादित ताकद असूनही स्वतंत्रपणे २९३ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ २ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने केंद्रीय मुख्यालय आणि राज्य युनिटच्या माध्यमातून बंगालमध्ये ४२.०८ कोटी रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. यात सामान्य प्रचारावरील १२.९६ कोटी रुपये आणि उमेदवारांवरील २९.१२ कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. बंगालमध्ये अनेक दशके सत्ता गाजवणाऱ्या माकपने १९७ जागा लढवून १ जागा जिंकली. माकपच्या राज्य युनिटने उमेदवारांवरील खर्चासह एकूण ८.२३ कोटी रुपये खर्च केल्याचे जाहीर केले. बंगालमध्ये भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या तृणमूल काँग्रेसचे खर्च विवरणपत्र अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : बाप्पा निघाले गावाला; नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी BMC ची जय्यत तयारी

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, दुष्काळाबाबत मदतीचा आदेश आज निघणार

मुंबई, पुण्यातील निवासी अतिक्रमणे होणार अधिकृत

मीरा-भाईंदरमध्ये बांधकामाच्या परवानग्या कशा? 'सेव्हन इलेव्हन' प्रकरणाची चौकशी

Palghar : कारखान्याची भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू