File Photo 
राष्ट्रीय

भाजप कोत्या मनाचा, नेहरूंचे नाव वगळल्याने काँग्रेसची टीका

भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना आयआयटी, आयआयएम, इस्रो आणि डीआरडीओ यासारख्या संस्थांबाबत काळजी वाटत आहे

नवशक्ती Web Desk

भाजप सरकारने नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे नाव बदलून प्राइम मिनिस्टर म्युझियम अॅँड लायब्ररी केल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाने भाजपवर टीका करताना यातून भाजपचे कोते मन दिसून येते, असे म्हटले आहे.

काँग्रेसने पुढे म्हटले आहे की, ही लायब्ररी म्हणजे विचारवंत आणि संशोधकांसाठी खजिना आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी येथे अध्ययन करण्याची गरज आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारत समृद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. जेव्हा भारतात एक सुर्इ देखील निर्माण केली जात नव्हती तेव्हा नेहरूंनी या देशाची सूत्रे हाती घेतली. भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना आयआयटी, आयआयएम, इस्रो आणि डीआरडीओ यासारख्या संस्थांबाबत काळजी वाटत आहे. आपल्या मित्रांना फायदा करून देण्यासाठी या संस्था ते विकत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने टीका केली. माजी पंतप्रधानांच्या नावाने निर्माण झालेल्या सरकारी योजना, पुरस्कार, इमारती यांची नावे बदलणे हे मोदी यांच्या छोट्या मनाचे लक्षण आहे, पण मोदींनी हे लक्षात घ्यायला हवे की त्यांच्याच नेत्याने म्हटले आहे की छोट्या मनापेक्षा कोणीही मोठा नसतो.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त