राष्ट्रीय

भाजप म्हणजे विष, काढून फेका! मल्लिकार्जुन खर्गेंनी भाजपला डिवचले

‘हर गांधी से मोदी डरता है’, अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपला डिवचले.

Swapnil S

मुंबई : देशात संगणक आणण्याचे काम राजीव गांधी यांनी केले, महिलांना आरक्षण त्यांच्यामुळे मिळाले, विशेष म्हणजे राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील आहे. त्यामुळे मुंबई आणि राजीव गांधी हे नातं आधीपासूनचं आहे. देशासाठी त्याग करणारे महाराष्ट्रात जन्माला आले. त्यामुळे ‘हर गांधी से मोदी डरता है’, अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपला डिवचले.

देश घडवण्यात नेहरु गांधी यांचे मोठे योगदान आहे, देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचे काम नेहरु गांधींनी केले. त्यामुळे इतिहासात नेहरु गांधी नाव कोणी पुसू शकत नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, षण्मुखानंद हॉलमध्ये सद्भावना व संकल्प दिवसाच्या आयोजित कार्यक्रमात राजीव गांधी यांनी केलेल्या कामांना उजाळा दिला.

राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला, पण त्यांना अहंकार नव्हता. मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्यांना महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगु देसमच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे. मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकूमशाह बनून सत्तेवर नियंत्रण आपल्या हाती ठेवायचे आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवला, आणि विधानसभा निवडणुकीत ही भाजपला जागा दाखवणार, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर येथील विरोधी पक्षांची सरकारे तोडफोड करून घालवली व भाजपाची सत्ता आणली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोदींनी फोडले व फुटीरांना राज्यसभा बहाल केल्या. पण लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चोख उत्तर दिले व जनतेने २४० वरच रोखले. आता विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढा व मविआचे सरकार आणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मोदींचे चिल्लर काम

राजीव गांधी यांनी विविध लसीकरण केले पण कधीच त्यांचा फोटो लावला नाही पण मोदी कोरोना लसीच्या पत्रकावर फोटो लावण्याचे चिल्लर काम केले, या शब्दात मोदींची खिल्ली उडविली.

राजीव गांधी यांनी देशाला नवी दिशा दिली - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, मुंबई व काँग्रेस, मुंबई व राजीव गांधी यांचे वेगळे नाते आहे. राजीव गांधी यांचा देशाच्या उभारणीत मोठा वाटा आहे, देशाला नवी दिशा दिली आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना नेहरू-गांधी म्हटले तर काय होते काय माहित नाही, ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांच्याविषयी आकसाची भूमिका पंतप्रधान व त्यांचे सहकारी घेतात, असा हल्लाबोल पवार यांनी भाजपवर केला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी