राष्ट्रीय

धाडसी तरुणीने दिला मद्यधुंद तरुणाला चोप; अनंतपूरमध्ये रस्त्यावर गोंधळ, Video व्हायरल

आंध्र प्रदेशच्या अनंतपूर शहरात हाउसिंग बोर्ड कॉलनी परिसरातून एक तरुणी स्कूटरवर जात असताना एका मद्यधुंद तरुणाने तिच्याशी गैरवर्तन केले. या अपमानास्पद प्रकारावर ती तात्काळ भडकली आणि आपली स्कूटर थांबवत तिने त्या तरुणाला रस्त्यातच चांगला चोप देत धडा शिकवला.

Mayuri Gawade

आंध्र प्रदेशच्या अनंतपूर शहरात एका तरुणीने दाखवलेले धाडस सध्या सर्वत्र चर्चेत आहे. हाउसिंग बोर्ड कॉलनी परिसरातून स्कूटरवर जात असताना एका मद्यधुंद तरुणाने तिच्याशी गैरवर्तन केले. या अपमानास्पद प्रकारावर ती तात्काळ भडकली आणि आपली स्कूटर थांबवत तिने त्या तरुणाला चांगलेच फैलावर घेतले. तिने त्याला रस्त्यातच चांगला चोप देत धडा शिकवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या तरुणीच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

मित्रांच्या हस्तक्षेपानंतरही तरुणी आपल्या भूमिकेवर ठाम

व्हिडिओमध्ये दिसतंय की, तरुणीचा आवाज ऐकताच परिसरातील लोक लगेच जमले. त्यांनी देखील तरुणीला साथ दिली आणि आरोपीला पळून जाऊ दिले नाही. काही वेळाने आरोपीचे मित्र घटनास्थळी आले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला, तरीदेखील तरुणी ठाम उभी राहून आरोपीला धोपटत राहिली.

गोंधळ वाढत असल्याने पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जमाव पांगवून आरोपीला ताब्यात घेतले. तपासात तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्यावर छेडछाड आणि सार्वजनिक त्रासदायक वर्तनाचे गुन्हे नोंदवले आहेत.

सोशल मीडियावर कौतुक

या प्रकाराचा संपूर्ण व्हिडिओ प्रत्यक्षदर्शींनी मोबाईलमध्ये टिपला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. देशभरातून या तरुणीच्या धैर्याचे कौतुक केले जात आहे. अनंतपूरसह अनेक नेटिझन्सनी अशा प्रवृत्तीला कठोर शिक्षा व्हावी, महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी काटेकोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

राज्यातील शाळा आज बंद! कारवाईच्या 'त्या' आदेशानंतरही शिक्षक संघटना आंदोलनावर ठाम

बांगलादेशला पाठवलेल्या गर्भवती महिलेला व तिच्या मुलाला परत आणू; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन

आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू! विजय मल्ल्याला हायकोर्टाने सुनावले

पुण्याच्या मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरण: शीतल तेजवानीला पोलीस कोठडी

भारत-रशिया मैत्रीचे नवे पर्व! मोदी-पुतीन गळाभेट, जंगी स्वागत; द्विपक्षीय परिषदेत संरक्षण, व्यापार, स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सवर भर