'लायन'ची सहा दशकांनी भारतात वापसी; प्रीमियम बिअरसह ब्रिटिश बीअर उत्पादकाचा दिल्लीच्या बाजारात प्रवेश 
राष्ट्रीय

'लायन'ची सहा दशकांनी भारतात वापसी; प्रीमियम बिअरसह ब्रिटिश बीअर उत्पादकाचा दिल्लीच्या बाजारात प्रवेश

ब्रिटिश बीअर उत्पादक कंपनी 'लायन ब्रुअरी को'ने सहा दशकांहून अधिक काळाच्या खंडानंतर भारतीय बाजारात पुनरागमन केले आहे. वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम बीअर क्षेत्राचा फायदा घेण्याच्या उद्देशाने कंपनीने दिल्लीत आपल्या प्रीमियम बिअर पोर्टफोलिओचे अनावरण केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ब्रिटिश बीअर उत्पादक कंपनी 'लायन ब्रुअरी को'ने सहा दशकांहून अधिक काळाच्या खंडानंतर भारतीय बाजारात पुनरागमन केले आहे. वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम बीअर क्षेत्राचा फायदा घेण्याच्या उद्देशाने कंपनीने दिल्लीत आपल्या प्रीमियम बिअर पोर्टफोलिओचे अनावरण केले आहे.

कंपनीने भारतातील एकमेव आयातदार आणि वितरक म्हणून 'कॉपरड्रॉप स्पिरिट्स'सोबत भागीदारी केली आहे. पुढील टप्प्यात हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये वितराणाचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.

१८३६ मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेल्या या बीअर उत्पादक कंपनीचे भारताशी ऐतिहासिक संबंध राहिले आहेत. ब्रिटिश काळात भारतात निर्यातीसाठी विशेषतः विकसित केलेल्या 'इंडिया पेल एल' बिअर शैलीच्या सुरुवातीच्या उत्पादकांमध्ये आणि निर्यातदारांमध्ये या कंपनीचा समावेश होता.

भारत ही आमच्यासाठी लायन ब्रुअरीच्या इतिहासाचा एक भाग आहे, असे लायन ब्रुअरी कोचे व्यवस्थापकीय संचालक विल ज्युलियस यांनी सांगितले. लायनला भारतात परत आणणे आणि तेही अशा वेळी जेव्हा प्रीमियम बीअर क्षेत्र इतक्या वेगाने वाढत आहे, ही अत्यंत उत्साहाची गोष्ट आहे.

लायन ब्रुअरी भारतीय बिअर बाजारातील प्रीमियम क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहे. मायक्रोब्रुअरीजची प्रचंड वाढ यामुळे हे क्षेत्र ४० टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली