एक्स (@OSINTJK आणि @PakStratprism)
राष्ट्रीय

‘बीएसएफ’चा जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात; चुकून ओलांडली सीमारेषा; सुटकेसाठी प्रयत्न सुरू

जवानाची सुटका करण्यासाठी पाकिस्तान रेंजर्ससोबत फ्लॅग मीटिंग्स घेतल्या जात आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या माध्यमांनी ताब्यात घेतलेल्या जवानाचे डोळ्यांवर पट्टी बांधलेले फोटो प्रसिद्ध केले आहेत. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Krantee V. Kale

पंजाबच्या फिरोजपूर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील झीरो लाइनवर बुधवारी दुपारी भारतीय सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान पी. के. सिंह चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेला असता पाकिस्तानी रेंजर्सनी या जवानाला ताब्यात घेतले आहे. जवानाची सुटका करण्यासाठी पाकिस्तान रेंजर्ससोबत फ्लॅग मीटिंग्स घेतल्या जात आहेत, असे गुरुवारी बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

द हिंदूच्या वृत्तानुसार, १८२ व्या तुकडीतील कॉन्स्टेबल पी. के. साहू हे बुधवारी कुंपणाच्या पलीकडे शेतकऱ्यांसोबत असताना फिरोजपूर सीमेजवळ चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले आणि त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. साहू हे पश्चिम बंगालचे रहिवासी असून, त्यांनी वर्दी घातली होती आणि त्यांच्याकडे सर्विस रायफलही होती. ते सावलीत विश्रांतीसाठी थोडे पुढे गेले असताना रेंजर्सनी त्यांना अटक केली. पाकिस्तानच्या माध्यमांनी साहू यांचे डोळ्यांवर पट्टी बांधलेले फोटो प्रसिद्ध केले आहेत. तथापि, एका अधिकाऱ्याने सांगितले की अशा घटना सामान्य आहेत आणि दोन्ही बाजूंमध्ये यापूर्वीही घडल्या आहेत.

शेतकऱ्यांना बीएसएफच्या उपस्थितीत कुंपणाच्या काही मीटर पुढे जाऊन शेती करण्याची मुभा असते. झीरो लाइन क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष परवानगी दिली जाते. पेरणी आणि काढणीच्या वेळेला ‘बीएसएफ’चे जवान तैनात असतात. दरम्यान, जवानाला भारतात माघारी आणण्यासाठी ‘बीएसएफ’चे अधिकारी पाकिस्तान रेंजर्ससोबत चर्चा करीत आहेत.

पहलगामममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे भारतात पाकविरोधी वातावरण तापलेले असताना आणि दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असताना ही घटना घडली आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

Filmfare Awards Marathi 2025 : पहिलाच चित्रपट आणि थेट 'फिल्मफेअर'! अभिनेता धैर्य घोलपला ‘एक नंबर’ चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू पुरस्कार

Filmfare Awards Marathi 2025 : क्षितीश दाते ठरला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर; 'या' भूमिकेसाठी मिळाला पहिला फिल्मफेअर!

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार