१ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय  
राष्ट्रीय

१ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

दूरसंचार कंपन्यांनी ४ जी आणि उच्च-पिढीच्या तंत्रज्ञानावर सीएनएपी लागू करण्यासाठी यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानुसार, १ नोव्हेंबर २०२६ पासून देशातील सर्व ४जी आणि ५जी मोबाईल नेटवर्कवर येणाऱ्या कॉलरचे मूळ नाव स्क्रीनवर दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाला तांत्रिक भाषेत सीएनएपी सेवा म्हटले जाते.

याबाबत दूरसंचार विभागाने १३ ऑक्टोबर रोजी एक अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, दूरसंचार कंपन्यांनी ४ जी आणि उच्च-पिढीच्या तंत्रज्ञानावर सीएनएपी लागू करण्यासाठी यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत.

१ नोव्हेंबरपासून लागू

ही सेवा देशभरातील सर्व टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांद्वारे १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू केली जाईल. फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जसा सेव्ह असेल, त्या नावानंतर टेलिकॉम कंपनीकडे नोंदणीकृत असलेले मूळ नाव स्क्रीनवर दिसेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest : झुरळे आज पुन्हा रस्त्यावर; मार्च रोखण्यास न्यायालयाचा नकार, तर पालिकेचा खोडा

१७ राज्यांमध्ये ‘एसएसआर’; निवडणूक आयोगाची घोषणा

नागरिकांविरोधात पुकारले युद्ध

आजचे राशिभविष्य, १६ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नवरात्रीत गोडाचा बेत! घरच्या घरी बनवा मखाना-नारळाची बर्फी; रेसिपी सोपी, नैवेद्यासाठीही उत्तम पर्याय