नवरात्रीत गोडाचा बेत! घरच्या घरी बनवा मखाना-नारळाची बर्फी; रेसिपी सोपी, नैवेद्यासाठीही उत्तम पर्याय

Navratri 2026 : नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी मखाना, नारळ आणि माव्यापासून बनवा स्वादिष्ट बर्फी. मोजक्या साहित्यात घरच्या घरी तयार करण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
नवरात्रीत गोडाचा बेत! घरच्या घरी बनवा मखाना-नारळाची बर्फी; रेसिपी सोपी, नैवेद्यासाठीही उत्तम पर्याय
नवरात्रीत गोडाचा बेत! घरच्या घरी बनवा मखाना-नारळाची बर्फी; रेसिपी सोपी, नैवेद्यासाठीही उत्तम पर्याय'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on: 

नवरात्रीत गोडाचा बेत करताना नेहमीच्या मिठाईऐवजी काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर मखाना-नारळाची बर्फी हा चांगला पर्याय आहे. मखाना, ताजा नारळ आणि मावा यांचा वापर करून ही बर्फी घरच्या घरी सहज तयार करता येते. मखान्याची खास चव, नारळाचा स्वाद आणि माव्याचा मऊपणा यामुळे हा गोड पदार्थ खायला छान लागतो. नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा घरातील मंडळींसाठी काहीतरी गोड बनवायचं असेल, तर ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.

मखाना-नारळाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य

  • मखाना - २ कप

  • मावा - २५० ग्रॅम

  • ताजा नारळाचा किस - १ कप

  • साखर - पावणेदोन कपापेक्षा कमी, म्हणजे साधारण ¾ कप

  • साजूक तूप - १ चमचा

  • वेलची पूड - अर्धा चमचा (ऐच्छिक)

नवरात्रीत गोडाचा बेत! घरच्या घरी बनवा मखाना-नारळाची बर्फी; रेसिपी सोपी, नैवेद्यासाठीही उत्तम पर्याय
सणासुदीला काहीतरी गोड बनवायचंय? ट्राय करा ओल्या खोबऱ्याचा हलवा
नवरात्रीत गोडाचा बेत! घरच्या घरी बनवा मखाना-नारळाची बर्फी; रेसिपी सोपी, नैवेद्यासाठीही उत्तम पर्याय
Navratri 2026 : नऊ दिवस उपवास आणि दिवसभर धावपळ? फराळासाठी आधीच करून ठेवा 'ही' तयारी

मखाना-नारळाची बर्फी बनवण्याची सोपी कृती

१. मखाना भाजून घ्या : सर्वप्रथम कढईत थोडे तूप गरम करा. त्यात मखाने घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर मखाने एका ताटात काढून पूर्ण थंड होऊ द्या.

२. मखान्याची पूड तयार करा : भाजलेले मखाने मिक्सरमध्ये घालून त्यांची बारीक पूड करा. त्यात साखर मिसळून पुन्हा एकदा फिरवू शकता. मखाने पूर्ण थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये घाला.

३. मावा आणि नारळ शिजवा : आता एका कढईत मावा घालून मंद आचेवर सतत ढवळत गरम करा. मावा मऊ झाल्यावर त्यात नारळाचा किस घाला. हे मिश्रण साधारण २ ते ३ मिनिटे एकत्र शिजवा.

४. सर्व साहित्य एकत्र करा : आता मखान्याची पूड आणि साखर यांचे मिश्रण कढईत घाला. त्यानंतर वेलची पूड घालून सर्व साहित्य नीट एकजीव करा. मिश्रण कढईच्या बाजू सोडू लागेपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा. मिश्रण जास्त कोरडे होणार नाही, याची काळजी घ्या.

५. बर्फीला आकार द्या : एका ताटाला किंवा ताटलीला तुपाचा हलका हात लावा. त्यावर तयार मिश्रण पसरवून घ्या आणि चमच्याने किंवा वाटीच्या तळाने एकसारखे दाबा.

६. थंड करून तुकडे करा : मिश्रण खोलीच्या तापमानाला थंड होऊ द्या. त्यानंतर सुरीने चौकोनी किंवा आपल्या आवडीच्या आकारात बर्फी कापून घ्या. अशा प्रकारे घरच्या घरी मखाना-नारळाची बर्फी तयार होईल.

नवरात्रीत गोडाचा बेत! घरच्या घरी बनवा मखाना-नारळाची बर्फी; रेसिपी सोपी, नैवेद्यासाठीही उत्तम पर्याय
Navratri 2026 : उपवासातही खाता येईल असा खमंग आलू पराठा; साबुदाणा आणि बटाट्यापासून बनवा सोपी रेसिपी

तयार बर्फी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. तसेच नवरात्रीच्या दिवसांत घरातील मंडळींना किंवा पाहुण्यांनाही ती खायला देऊ शकता. बर्फीमध्ये मावा आणि ताजा नारळ वापरला असल्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये साठवणे योग्य ठरेल. किती दिवस टिकेल हे साहित्याची ताजेपणा, स्वच्छता आणि साठवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे ती शक्यतो लवकर खावी.

logo
marathi.freepressjournal.in